मुंबई 06 मे: राज्य आणि मुंबईमधली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतली रुग्ण संख्या वाढत असल्याने आता डॉक्टर्स कमी पडत आहेत. क्रिटिकल पेशंट्ससाठी बेडही कमी पडत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत संरक्षण विभागाकडे काही ICU बेड आहेत, डॉक्टर्स आहेत ते त्यांनी दिले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र तो पर्याय हा शेवटचा ठेवा असं लष्कराच्या डॉक्टर्सनी सांगितलं असंही ते म्हणाले.
राज्यात आज 1233 नवीन रूग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 16758 एवढी झाली आहे. तर आज 34 मृत्यू झालेत. तर मुंबई महापालिका हद्दीत दहा हजार टप्पा पार पडला. मुंबईत एकुण रुग्णसंख्या तब्बल 10714 एवढी झालीय. तर आतापर्यंत 412 जणांचा मृत्यू झाला. आज 275 जणांना डिस्चार्ज मिळाला.
आज मृत्यू झालेल्यां 34जणांमध्ये सर्वाधिक 25 जण मुंबईचे, तर पुणे 3, अकोला 3, जळगांव सोलापूर प्रत्येकी 1 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 24 तासात 769 रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे मुंबई हे सर्वात मोठं आव्हान आहे. धारावी मध्ये कोरोनाचे 68 नवे रुग्ण आढळून आले आहेत.आजचे मिळून धारावीत एकूण रुग्ण संख्या 733 वर पोहोचली आहे.
चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...
ठाण्यात आज तब्बल ४६ करोना बाधित रुग्ण आढळले. आता ठाण्यात एकूण ४९६ करोना बाधित झाले आहेत. आता पर्यंत एकूण १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे 700 रुग्णांना घरी सोडण्यात आलंआहे. एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही दिलासादायक बातमी दिली आहे.
कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी पत्नी रुग्णालयात तर पती घर सांभाळून जातो ड्युटीवर
सरकारने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (4 मे) आणि मंगळवारी (5 मे) अनुक्रमे 350 आणि 354 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंत सुमारे सव्वा महिन्यात 2819 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.