मुंबई, 29 सप्टेंबर : गुलाब चक्रीवादळा (Cyclone Gulab)मुळे राज्यातील मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Heavy to heavy rainfall) झाली. या अतिवृष्टीच्या संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यात सप्टेंबर महिन्यात 71 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली.
आत्तापर्यंत 436 नागरिकांचा मृत्यू
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात 71 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राज्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत काही ठिकाणी 4 तर काही टिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर केवळ वीज कोसळून 196 जणांचा मृत्यू झाला आहे.
"शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान
गुलाब चक्रीवादळामुळे 2 दिवसात पावसाने अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना जीव गमवावा लागला, जनावर वाहून गेली आहेत. काही ठिकाणी 100 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात सरासरी 170 ते 190 मिली पाऊस झाला आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर आणि बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत 81 % पंचनामे झाले असून 19% पंचनामे उर्वरित आहेत. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत. पंचनामे झाल्यानंतर 22 लाख हेक्टर जमिनीच नुकसान होण्याची अंदाज आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे 7 ते 8 हजार कोटीचं अंदाजित नुकसान झालं आहे. मागील 3 दिवसात उस्मानाबादमध्ये 6 जण तेरणा नदीच्या पाण्यात अडकले होते, त्यांना वाचवण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने बुलडाणा, औरंगाबाद आणि लातूर येथे एकही मृत्यू नाही. मृतकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत असंही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीमुळे घरांचे अत्यल्प नुकसान झाले आहे. 1667 कच्ची घर अंशतः पडली आहेत. तर 19 घर पूर्ण पडली आहेत.
VIDEO: उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा
मदतीसाठी केंद्राकडे पत्र व्यवहार
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यात गारपीट आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ, जून आणि ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी या संदर्भात 9 डिसेंबर 2020 रोजी केंद्राला पत्र लिहिले होते. 3721 कोटींपैकी केवळ 701 कोटी रुपये मिळाले. तौत्के चक्रीवादळानंतर 2 जुलै 2021 रोजी 203 कोटी राज्याला मिळावे असा प्रस्ताव होता पण काहीही मिळाले नाही. 1679 कोटी रुपये जूनमध्ये आलेल्या पूराच्या वेळी मिळावे असा प्रस्ताव होता पण काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय प्रस्ताव पाठवू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Vijay wadettiwar, महाराष्ट्र