शेतीचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोढ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे आपल्या शेतीचं झालेलं नुकसान पहावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातून रामवाडी वगळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या भागाची पाहणी करण्याची हात जोडून विनंती केली. बीड जिल्ह्यात पावसाने उघडीप, अद्याप जनजीवन विस्कळीत बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने, आज थोडी उघडीप दिली आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मांजरा आणि माजलगाव धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तर जिल्ह्यातील मांजरा, सिंदफणा, गोदावरी वाण, सरस्वती, बोभाटी, कुंडलिका, बिंदुसरा नद्यांसह अनेक नद्यांना, गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात तुफान पूर आला होता. यामुळं आपेगाव, देवळा, पारगाव शिमरी, रेवकी, राजापूर, यांसह अनेक गाव पाण्यात गेली होती. दरम्यान आज अनेक भागातील पुराचं पाणी कमी होत आहे. मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. गावखेड्यातील नदीवरील पूलं वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. विद्युत डीपी, पोल, तारांची पडझड झाल्यानं अंबाजोगाई तालुक्यातील अपेगाव, देवळा गावांसह अनेक गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून लाईट नाही. त्यामुळं स्वच्छ पाणी, आटा, मोबाईल चार्जिंग यासह अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. शेतात राहणाऱ्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे परीक्षेस पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, पुन्हा होणार परीक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं,राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा pic.twitter.com/ubAlTVx5zA
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.