मुंबई, 30 जून : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मे आणि जूनच्या सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेत आता देशांतर्गत विमान प्रवास स्वस्त झाला आहे. तिकिट दर कमी झाल्याने नागरिक विमानाने प्रवास करू शकतील. पावसाळा सुरू झाला असला तरी भारतातील दैनंदिन डोमेस्टिक पॅसेंजर ट्रॅफिक फारसं कमी झालेलं नाही. ते 4 लाखांहून अधिक आहे, पण देशांतर्गत तिकिट दर खूपच कमी झाल्यामुळे मागणी-पुरवठा समीकरणात बदल दिसून येत आहे. दिल्ली ते मुंबईसाठी भाडं सर्वाधिक असतं. पण आता या शहरांमधील 24 तासांच्या आधीच्या तिकिट दरातही मोठी घसरण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या सुरुवातीस, दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी दिल्ली ते मुंबई सर्वात स्वस्त वन-वेचे तिकिट नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी सुमारे 19,000 रुपयांपासून सुरू व्हायचं. दिल्ली-मुंबईच्या तुलनेत दिल्ली-दुबईचे भाडे 14,000 रुपये होतं. नागरी उड्डाण मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यानंतर, त्या मार्गावरील भाडे 18,000 रुपये आणि एका आठवड्यानंतर 14,000 रुपये झाले. गुरुवारी, दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त दिल्ली-मुंबई तिकिटाची किंमत 4,500 रुपये होती. इतर मार्गांवरही शेवटच्या क्षणी तिकिट दर कमी झाले आहेत. उदाहरणार्थ, बर्याच काळानंतर मुंबई ते कोची या नॉन-स्टॉप फ्लाईटचे 24 तासांच्या आधी बुकिंग केल्यास तिकिटाची किंमत 4,000 रुपये आहे. गेल्या महिन्यात या मार्गावरील सर्वांत स्वस्त तिकीट 20,000 रुपयांवर गेलं होतं. Vande Bharat : विमानापेक्षा महाग तिकीट, सर्वात कमी स्पीड! मुंबई-गोवा वंदे भारतच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत? गो फर्स्टने मे महिन्याच्या सुरुवातीला फ्लाइट कॅन्सल केल्यानंतर-एअरलाइनला आठवड्यातून 1,538 उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर देशांतर्गत काही विशिष्ट मार्गांवरील विमानभाडे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या सुरुवातीला प्रचंड वाढले होते. लेह आणि श्रीनगरला जाणार्या फ्लाइट्सचे विमान भाडे सर्वाधिक वाढले कारण या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसाठी गो फर्स्ट ही सर्वांत आवडती फ्लाईट होती. नॉन-स्टॉप फ्लाइटचे सर्वांत स्वस्त दिल्ली-लेह वन-वे तिकीट सध्या 15,000 रुपये आहे. गेल्या महिन्यात ते सुमारे 23,000 रुपये होतं. रांचीसारख्या शहरांसाठी विमानाचे तिकिट दर खूप महाग आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.