जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / महाराष्ट्र भूषण सोहळ्यात तो तर अपघात, राज ठाकरेंची नवी भूमिका

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात तो तर अपघात, राज ठाकरेंची नवी भूमिका

(राज ठाकरे)

(राज ठाकरे)

धर्माधिकारी यांचा सत्कार हा राजभवनामध्ये झाला असता तर एवढ्या लोकांना येण्याची गरज नसती

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. पण, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार हा राजभवनामध्ये झाला असता तर एवढ्या लोकांना येण्याची गरज नसती. त्यामुळे एवढी लोक आली नसती, मला वाटतो तो अपघात आहे, अपघाताचं काय राजकारण करायचं? असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन भूमिका मांडली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राज ठाकरेंनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरून भाष्य केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

एका पत्रकाराने उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे, यावर राज ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात अनेक हलगर्जीपणा झाला आहे. तिथे सुद्धा सदोषमनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो, त्यामुळे यावर राजकारण करू नये’ अशा टोला राज ठाकरेंनी लगावला. (…आणि राज ठाकरे झाले ‘माननीय मुख्यमंत्री’, वर्षा बंगल्यावरचे खास PHOTOS) ‘खरंतर सकाळची वेळ करायला नको होती, मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं, धर्माधिकारी यांचा सत्कार हा राजभवनामध्ये झाला असता तर एवढ्या लोकांना येण्याची गरज नसती. एवढी लोक आली नसती, मला वाटतो तो अपघात आहे, अपघाताचं काय राजकारण करायचं? असंही राज ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे, खारघरमध्ये जेव्हा ही घटना घडली होती, त्यावेळी राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट टाकून तीव्र संताप व्यक्त केला होता. (अजितदादा इज बॅक, एकाच दिवशी राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांना पाठवले 2 पत्र, कारण…) ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा सवालच राज यांनी केला होता. तसंच, सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला. तसंच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सहभागी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात