Home /News /mumbai /

पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा

पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याची माहिती समोर आल्यावर आता आणखी एक नवी माहिती उघड झाली आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून दर महिन्याला 10 लाख रुपये नातेवाईकांना पाठवत असल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे.

    मुंबई, 25 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पाकिस्तानात असल्याची माहिती त्याचा भाचा अलीशाह पारकरनं दिली. त्यानंतर आता ईडीच्या चौकशीत (ED inquiry) आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) एका साक्षीदाराने ईडीसमोर खळबळजनक खुलासा केला आहे. साक्षीदार खालिद उस्मान शेख याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले, इक्बाल कासकरने त्याचा मोठा भाऊ दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं सांगितले. इतकेच नाही तर दाऊद इब्राहिम प्रत्येक महिन्याला पाकिस्तानातून 10 लाख रुपये आपल्या नातेवाईकांसाठी पाठवत असल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे. खालिद उस्मान शेख याने पुढे म्हटले, इक्बाल कासकर याने पैसेही दाखवले आणि हे पैसे दाऊद भाऊकडून आल्याचंही त्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, खालिद उस्मान शेखचा भाऊ, इक्बाल कासकर हे बालपणापासून मित्र आहेत. खालिदचा भाऊ एका गँगवॉरमध्ये मारला गेला होता. तो दाऊदची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल यालाही ओळखत होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अंगरक्षकही होता. खालिदने ईडीला सांगितले की, एकदा सलीमने त्याला सांगितले होती की तो दाऊदचे नाव वापरुन हसीनासोबत पैसे उकळत आहे. तसेच मालमत्ता सुद्धा हडप करत आहे. वाचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लागला ठावठिकाणा; भाच्यानं केला मोठा खुलासा तर ईडीचे म्हणणे आहे की, सलीम पटेल याने हसीना पारकरसोबत मुंबईतील कुर्ला परिसरातील गोवावाला कंपाऊंडवर देखील अतिक्रमण केले. जे नंतर नवाब मलिकांच्या कुटुंबाला विकले. इक्बाल कासकर आणि हसीनाचा मुलगा अलीशाह याच्यासोबत इतर अनेक साक्षीदारांनीही दाऊद पाकिस्तानात असल्याबाबत सांगितले आहे. कासकरचा खुलासा मनी लॉन्ड्रिंग आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कासकरने आपल्या जबाबात म्हटले, 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार असलेला आणखी एक दहशतवादी अनीस हा सुद्धा पाकिस्तानात राहतो. कासकरने सांगितले, दाऊदच्या पत्नीचे नाव महमबीन आहे. त्याला पाच मुले आहेत. मोईन नावाचा एक मुलगा आहे आणि त्याच्या सर्व मुलींची लग्न झाली आहेत. तर मुलाचेही लग्न झाले आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Dawood ibrahim, ED

    पुढील बातम्या