मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Exclusive darshan solanki case : IIT मुंबईमध्ये दर्शन सोलंकी प्रकरणाला नवे वळण, मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस

Exclusive darshan solanki case : IIT मुंबईमध्ये दर्शन सोलंकी प्रकरणाला नवे वळण, मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस

या प्रकरणी एक SIT समिती स्थापन करण्यात आली होती. या तपासात एक सुसाइड नोट सापडली होती.

या प्रकरणी एक SIT समिती स्थापन करण्यात आली होती. या तपासात एक सुसाइड नोट सापडली होती.

darshan solanki : आयआयटी मुंबई येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दर्शन सोलंकी (18) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च : मुंबई येथील आयआयटी पवईमध्ये दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

गुजरातमधील आरटीआय कार्यकर्ते कांती परमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एनएचआरसीने या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तंना नोटीस बजावली आहे.

आयआयटी मुंबई येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दर्शन सोलंकी (18) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. वसतिगृह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत त्याने आपले जीवन संपवले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. या प्रकरणी एक SIT समिती स्थापन करण्यात आली होती. या तपासात एक सुसाइड नोट सापडली होती.   या सुसाईड नोटमध्ये काही विद्यार्थ्यांनी धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

दर्शनला जातीच्या नावावरूनही चिडवण्यात आलं होतं. या प्रकरणी SIT समितीने FIR दाखल केला होता. या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते कांती परमार यांनी माहितीच्या अधिकारीखाली माहिती मागवली. त्यानुसार एनएचआरसीने या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तंना नोटीस बजावली आहे.

 काय आहे प्रकरण?

दर्शन सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा होता. मग मागील तीन महिन्यांपूर्वी तो मुंबईतील पवई आयआयटीमध्ये आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीत असलेल्या आणखी एका विद्यार्थ्याने त्याला सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले.

(दर्शनची आत्महत्या जातीवादामुळे नाही तर.. IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचं वेगळच कारण समोर)

तर पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दर्शन इतरांशी फारच कमी बोलायचा. त्याच्या रूम पार्टनरसोबतही त्याचा फार संवाद नव्हता. त्याने एकटेपणाला कंटाळून हे पाऊल उचलले असावे, असे प्रथमदर्शनी असे दिसत आहे. नुकताच आयआयटी मुंबईतील पहिल्या सत्रामधील शेवटच्या परीक्षेचा समारोप झाला. शैक्षणिक दबावामुळे त्याचा ताण वाढला असावा, असा शैक्षणिक अंदाजही वर्तविण्यात येत आहे. कॅम्पसमधील सुरक्षा रक्षकांना हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्यावर ही घटना उघडकीस आली. मृताजवळ सुसाइड नोट सापडली होती. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला.

First published:
top videos

    Tags: IIT, Mumbai