मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेनेच्या रणनितीमुळे भाजपला धक्का; दिवंगत खा. मोहन देलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेच्या रणनितीमुळे भाजपला धक्का; दिवंगत खा. मोहन देलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

दादरा नगर हवेलीचे (Dadra and Nagar Haveli) खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सी ग्रीन हॉलेटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या (Mohan Delkar Suicide) केली होती.

    मुंबई, 7 ऑक्टोबर : दादरा नगर हवेलीचे (Dadra and Nagar Haveli) खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सी ग्रीन हॉलेटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या (Mohan Delkar Suicide) केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली याबाबतही मोठी चर्चा सुरू होती. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कला बेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या आहे. कला बेन देलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष (Kala Ben Delkar entering the shivsena in the presence of Chief Minister Uddhav Thackeray) प्रवेश करत आहेत. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन देलकर यांना देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Dadra and Nagar Haveli Late MP Mohan Delkars wife joins Shiv Sena) हे ही वाचा-ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपने दिली मोठी जबाबदारी या काळात शिवसेनेने देलकर यांच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या आत्महत्येची कडक चौकशी केली जाईल, असंही आश्वासन दिलं आहे. मोहन डेलकर (58) हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्याशिवाय ते दादरा आणि नगर हवेली येथून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Shivseana, Udhav thackarey

    पुढील बातम्या