मुंबई, 7 ऑक्टोबर : पुढील वर्षी पाच राज्यांच्या विधानसभा होण्यापूर्वी भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश आहे. तर पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांचा पुन्हा एकदा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून चित्रा वाघ या सातत्याने विविध मुद्द्यांवरुन आक्रमक होत ठाकरे सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न असो किंवा इतरही प्रश्न असो चित्रा वाघ सातत्याने ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. हेच पाहता आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने राष्ट्रीय कार्यसमिति एवं राष्ट्रीय कार्यसमिति के लिए विशेष आमंत्रित और स्थायी आमंत्रित (पदेन) सदस्यों की नियुक्ति की। https://t.co/7FRFUICsx7
— BJP (@BJP4India) October 7, 2021
विशेष आमंत्रित सदस्यांत सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्तापदी राज्यांतून संजू वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाचा : माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? Ajit Pawar यांचा सवाल वरुण गांधी, मनेका गांधी राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर भाजपच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीत मनेका गांधी आणि वरुण गांधी यांच्या नावाचा समावेश नाहीये. गेल्या काही काळापासून वरुण गांधी हे सातत्याने केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर लखीमपूर खेरी प्रकरणीही ते सातत्याने ट्विट करुन योगी सरकारवर दबाव टाकताना दिसत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मनोहरलाल खट्टर, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंग चौहान, प्रेमा खंडू, एन बिरेन सिंग, जय राम ठाकूर, प्रमोद सावंत यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी समितीमध्ये 50 विशेष आमंत्रित आणि 179 कायमस्वरुपी आमंत्रित सदस्य असणार आहेत. यामध्ये भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध विधानसभा, विधान परिषदेचे विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राज्य प्रभारी, सह-प्रभारी यांचा समावेश आहे. 7 नोव्हेंबर रोजी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.