Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईतील 850 कोविड रुग्णांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईतील 850 कोविड रुग्णांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे: तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) धोका लक्षात घेता सुरक्षेच्यादृष्टीने जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center)मधील रुग्णांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. दहिसर, बीकेसी, मुलुंड जंम्बो कोविड सेंटर मिळून एकूण 580 रुग्णांचे रात्रीच करणार स्थलांतर (Covid patients shifted at safe place) करण्यात येत आहे. अरबी समुद्रात (Arabian sea) घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलूंड येथील भव्य कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण 580 कोविड बाधित (580 Covid patient) रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (15 मे 2021) सायंकाळी या रुग्ण स्थलांतर कार्यवाहीबाबत नियोजन व आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. प्रामुख्याने तीन भव्य (जंम्बो) कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून 580 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आज रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु करावयाची आहे. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील 183, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील 243 आणि मुलुंड कोविड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, प्राणवायू पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलेंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर संयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Cyclone Tauktae: पुणेकरांनो काळजी घ्या; तौत्के वादळामुळे पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

कोणता रुग्ण कोणत्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला, त्यासाठी रुग्णवाहिका आणि इतर आवश्यक वैद्यकीय संयंत्रे व सामुग्री उपलब्ध आहे का? यासह विविध तपशिलवार कार्यवाही करण्यासाठी रुग्णालय निहाय समन्वय अधिकारी तात्काळ नेमण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी तिन्ही कोविड केंद्रांना दिले आहेत.

रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात येणार आहे. रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, तसेच प्रत्यक्ष स्थलांतर सुरु करताना वाहतूक पोलिसांसमवेत आवश्यक तो समन्वय साधावा, अशा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत असंही मुंबई मनपाने सांगितलं आहे.

First published: May 15, 2021, 11:49 PM IST

ताज्या बातम्या