भिवंडी, 17 मे : तौक्ते चक्रीवादळाने **(Cyclone Tauktae)**मुंबईवरील संकट टळले आहे. पण, वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरू आहे. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील शेलार इथं वादळ, वारा आणि पावसामुळे घरं कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोरगरिबांचा संसार उघड्यावर पडला आहे. भिवंडी परिसरात सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. शेलार गावच्या हद्दीतील बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये एक संपूर्ण घरच कोसळले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठे झाले आहे.
#MumbaiRains भिवंडी तालुक्यातील शेलार इथं वादळ, वारा आणि पावसामुळे घर कोसळले pic.twitter.com/V5bFHhklfP
— News18Lokmat (@News18lokmat) May 17, 2021
या घरात अडकलेल्या दोन जणांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले असून घर कोसळल्याने कुटुंबाला मात्र उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. रायगडमध्ये महिलेचा मृत्यू तर रायगड जिल्ह्यात पहाटे तीन वाजल्यापासूनच जिल्ह्यात या वादळाचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका भाजीविक्रेती महिला जखमी झाली आहे. ही तरुणी ठरली Miss Universe; पाहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे Photos प्राथमिक माहितीनुसार, पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 181 घरांना किरकोळ बाधा झाली आहे. या वादळात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7,866 नागरिकांना सुस्थळी प्रशासनाने हलविले आहे. तसेच जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष दरम्यान, “तौक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसंच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. एका झटक्यात होईल Mood चांगला; हे 11 हेल्दी पदार्थ एकदा खाऊन तर बघा! आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

)







