मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नेटफ्लिक्स प्लॅन रिन्यू करणं वृद्धाला पडलं महागात, 1.22 लाखांची फसवणूक

नेटफ्लिक्स प्लॅन रिन्यू करणं वृद्धाला पडलं महागात, 1.22 लाखांची फसवणूक

ईमेलमध्ये त्याला केवळ 499  रुपये भरायचे आहेत असं सांगण्यात आलं होतं. पण ओटीपी 1 लाख रुपयांसाठी पाठवण्यात आला होता.

ईमेलमध्ये त्याला केवळ 499 रुपये भरायचे आहेत असं सांगण्यात आलं होतं. पण ओटीपी 1 लाख रुपयांसाठी पाठवण्यात आला होता.

ईमेलमध्ये त्याला केवळ 499 रुपये भरायचे आहेत असं सांगण्यात आलं होतं. पण ओटीपी 1 लाख रुपयांसाठी पाठवण्यात आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 02 डिसेंबर : सायबर फसवणुकीमध्ये हॅकर्सकडून कधी आणि कशी फसवणूक केली जाईल हे सांगता येत नाही. त्यासाठी नवनव्या क्लृप्त्या हॅकर्स वापरत असतात. आता एका ७४ वर्षीय वृद्धाची नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन रिन्यू करत असताना १ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. आतापर्यंत स्कॅम करणाऱ्यांकडून मेसेजच्या माध्यमातून मालवेअर लिंक पाठवण्याचे प्रकार होत होते. मात्र एका वृद्ध व्यक्तीला नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन रिन्यू करण्यास सांगत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्हाला एखादा ईमेल किंवा व्हेरिफाय करण्यासाठीचा मेसेजे येतो तेव्हा तो नक्की कुठून आलाय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुंबईतील एका व्यक्तीचं यामुळे 1 लाख रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे. त्याने त्याच्या बँक अकाउंटच्या डिटेल्स स्कॅमर्सना नेटफ्लिक्सच्या रुपात शेअर केल्या. त्यांना नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्यासाठी बँक खात्याची डिटेल्स देण्यास सांगण्यात आलं होतं. 499 रुपये न भरल्याने त्यांचे सब्सक्रिप्शन थांबवण्यात आल्याचं त्यांना मेसेजमधून सांगण्यात आलं होतं.

एका प्लास्टिक प्रिंटिंगमध्ये काम करणाऱ्या वृद्धाने म्हटलं की, सायबर गुन्हेगारांकडून आलेला मेसेज हा नेटफ्लिक्सचा होता. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सकडून ज्या प्रकारचे मेसेज पाठवले जातात तसाच ईमेल असल्यानं आपण फसल्याचं वृद्धाने म्हटलं. पैसे गेल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा वृद्धाने जुहू पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

हेही वाचा : सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

फसवणुकीच्या ईमेलने 499 रुपये भरण्यासाठी एक लिंक पाठवली होती. त्यावर वृद्धाने काही विचार न करता दोन वेळा क्लिक केली. त्यानंतर सर्व क्रेडिट कार्डचे डिटेल्स भरले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 1.22 लाख रुपये पाठवण्यासाठी वृद्धाच्या मोबाईलवर ओटीपीसुद्धा आला होता.

पोलिसांनी खुलासा केला की, वृद्धाने ओटीपीच्या मेसेजमध्ये रकमेची खातरजमा न करता ईमेलवर ओटीपी शेअर केला होता. ईमेलमध्ये त्याला केवळ 499  रुपये भरायचे आहेत असं सांगण्यात आलं होतं. पण ओटीपी 1 लाख रुपयांसाठी पाठवण्यात आला होता. मात्र जेव्हा खात्यातून 1.22 लाख रुपये पाठवले नसतील तर 8 दाबा असा फोन कॉल बँकेतून आल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती झाली.

हेही वाचा : फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेलं अन्.. चारित्र्याच्या संशयातून प्रियकराचं धक्कादायक पाऊल

ओटीपी, बँक डिटेल्स शेअर करू नका

तुम्ही कधीही तुम्हाला आलेला ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका. मग तो नेटफ्लिक्सचा असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असेल. तुम्ही तुमच्या फोनवर स्वत: काही अपडेट करत असाल तर त्या ओटीपीचा वापर करा. त्याशिवाय इतर कोणालाही मेल, मेसेज, कॉलच्या माध्यमातून ओटीपी किंवा बँक डिटेल्स न देता अशा प्रकारची फसवणूक टाळता येऊ शकते.

First published:

Tags: Cyber crime, Mumbai, Netflix