जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर केंद्रावर गर्दी, वसई-विरारमध्ये झुंबड; Watch Video

लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर केंद्रावर गर्दी, वसई-विरारमध्ये झुंबड; Watch Video

लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर केंद्रावर गर्दी, वसई-विरारमध्ये झुंबड; Watch Video

लसीचे दोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासची परवानगी मिळणार असल्याने आता लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पहायला मिळते आहे. वसई विरार महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर एकच झुंबड उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी दोन डोस (Corona Vaccine) घेतलेल्यांना रेल्वे (Railway) प्रवासाला मुभा दिल्यानंतर वसई विरार (Vasai- Virar) महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर एकच झुंबड उडाली आहे. आज वसई-विरारमध्ये फक्त 17 केंद्रावर लसीकरण (Corona Vaccination) करण्यात येणार आहे. कालपासून लोकांनी रांगा लावून आपल्याला डोस कधी मिळेल याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र या ठिकाणी वसई विरार महानगर पालिकेचा एकही कर्मचारी दिसत नसल्यानं गोंधळ उडाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती मुंबईतही पाहायला मिळाली. लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासची परवानगी मिळणार असल्याने आता लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. बीकेसी केंद्रावर (BKC) आज लसीचा मर्यादीत 200 डोस उपल्ध असताना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

जाहिरात

मुंबईत पूर्ण क्षमतेनं लसीकरण गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे दोन दिवस लसीकरण बंद होतं. मुंबईत कालपासून पुन्हा एकदा लसीकरण सुरु झालं आहे. केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला सोमवारी 44 हजार कोव्हिशिल्डचे लस मिळाले. मॉल, हॉटेलच्या निर्बंधात शिथिलता?, काय ठरलं टास्क फोर्सच्या बैठकीत मुंबई पालिकेला 44 हजार डोस मिळाले असून राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या 314 केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात