मुंबई, 02 डिसेंबर: अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे.लोकप्रिय मराठी टीव्ही शो सहकुटुंब सहपरिवार तेव्हापासून जास्त चर्चेत आला जेव्हा एक्ट्रेस अन्नपूर्णा विठ्ठल (Annapurna Vitthal) यांनी मालिकेच्या निर्मात्याविरूद्ध आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मालिकेतील एक अभिनेत्री स्वाती भादवे हिने प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे (बंटी) विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
ETimes टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, स्वातीने सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरविरोधात धक्कादायक आरोप केलेत. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिने तिच्या कारकिर्दीत असा अनुभव कधीच घेतला नाही.
क्राईम पेट्रोल मध्ये केले काम
मालिकामध्ये काम करण्याबद्दल बोलताना स्वाती म्हणाली, "मी शोमध्ये नंदिता पाटकरसाठी बॉडी डबलचं काम केलं आहे. मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. नंदिता पाटकरला काही कारणास्तव सेटवर उशीर झाला होता, त्यामुळे मला तिची भूमिका करावी लागली. कारण त्या एका शॉटमध्ये तिची बॅकसाइडची आवश्यकता होती. म्हणजे त्या सीनमध्ये नंदिता पाटकर केवळ पाठमोरीचं दिसणार होती.
कामाच्या बदल्यात दिली लाजिरवाणी ऑफर
या घटनेबद्दल सांगताना स्वाती म्हणाली, 'स्वप्नील लोखंडे (बंटी) याने मला माझा नंबर विचारला. नंतर त्यांनी मला विचारले की मी पुण्यात काम करण्यास फ्लेक्सिबल आहे की नाही. मी म्हणाली होय, मला फ्लेक्सिबल आहे आणि कुठेही काम करू शकते.
हेही वाचा- 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, रुग्णालयातून डिस्चार्ज
मग त्याने मला विचारले, याच्या बदल्यात मी त्याला काय देऊ शकते? या कामाच्या बदल्यात मी त्याला कमिशन देईन असे सांगितलं. पण त्याला अजून काहीतरी हवे आहे असे तो म्हणाला. त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, असे त्याने स्पष्टपणे सांगितलं. त्या बदल्यात मला आणखी काम मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
पोलिसांकडून अटक
स्वाती पुढे म्हणाली, 'मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. मी क्राइम पेट्रोलमध्येही काम केले आहे. हिंदी टीव्ही शोसोबतच मी फुलला सुगंधा मातीचा, जिजामाता इत्यादी मराठी शोमध्येही काम केले आहे, पण असे कधीच अनुभवले नाही. मी गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे आणि आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचा मला आनंद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news