मुंबई, 02 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज (discharged from the hospital) देण्यात आला आहे. 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत. मानेचं दुखणं सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री 22 दिवस रुग्णालयात होते. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आज सकाळी सर एच. एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी आज अधिकृतरित्या सांगितले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 2, 2021
CM Uddhav Balasaheb Thackeray has been discharged from Sir H.N. Reliance Hospital this morning.
बऱ्याच दिवसांपासून सुरु होता मान आणि मणक्याचा त्रास काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून ऑनलाईन बैठका रुग्णालयात असतानाही उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उपस्थिती लावली.

)







