Home /News /mumbai /

कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईची ही कंपनी तयार करणार औषध, DCGIने दिली परवानगी

कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईची ही कंपनी तयार करणार औषध, DCGIने दिली परवानगी

आणीबाणीच्या परिस्थितीत असे प्रयोग करायला परवानगी दिली जात आहे. सुरुवातीला 1 हजार रुग्णांना ही गोळी देऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

    मुंबई 20 जून: ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स (glenmark pharmaceuticals) या मुंबईतल्या औषध निर्मात्या कंपनीला कोरोनावर उपचारासाठी गोळी तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) ही परवानगी दिली आहे. अँटीव्हायरल औषध असलेल्या फेव्हिपिरावीर (Favipiravir) ला फॅबिफ्लू (FabiFlu) या नावाने कंपनी बाजारात आणणार आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. या औषधाचं उत्पादन आणि मार्केटींगसाठी कंपनीला परवानगी मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्लेनमार्क ही 200 Mgची गोळी तयार करणार आहे. सध्या औषधाचे प्रयोग सुरू आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत असे प्रयोग करायला परवानगी दिली जात आहे. सुरुवातीला 1 हजार रुग्णांना ही गोळी देऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे. कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 87 लाखांहून अधिक आहे. भारतातही गेल्या आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीत वेगानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. भारतात 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona; कुटुंबातले 4 जण पॉझिटिव्ह कोरोनाचा सगळ्या धोक्याच्या आणि दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो असल्याचं WHO ने म्हटलं आहे. दोन आठवडे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा इशारा आधीच WHO ने दिला होता. कोरोना आता आणखीन 10 पट धोकादायक झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक या टप्प्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशकात कोरोनाचा कहर! 4 दिवसांत 25 जणांचा मृत्यू, रुग्णांनी गाठला नवा उच्चांक भारतात गेल्या 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 95 हजार 048 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 लाख 68 हजार 269 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 12 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेट भारताचा वाढता आहे. रिकव्हरी रेट आता 53.8% हून 54.1% झाला आहे.ार संपादन - अजय कौटिकवार
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus update

    पुढील बातम्या