मुंबई 10 सप्टेंबर: राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी 23 हजारांपेक्षा जास्त नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 23,446 नवे रूग्ण आढळलेत. तर 448 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंतच दिवसभरातली ही सर्वात जास्त संख्या आहे. राज्यातल्या रूग्णाची एकूण संख्या ही 9,90,795 एवढी झाली आहे.
सलग आठवडाभर दररोज 20 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसभरात 14,253 रूग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या वर गेली आहे. एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.
Oxford च्या कोरोना लशीचा नेमका काय झाला साइड इफेक्ट; कंपनीने दिली माहिती
यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, कोरोनाचं थैमान सुरू असताना ऑक्सफोर्डच्या लशीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र ही लस येण्यासाठी आता आणखीन उशीर होण्याची शक्यता आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल थांबवण्यात आली असून सीरम इन्स्टीट्यूटला नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसवर सीरम इंस्टीट्यूटनं आपली बाजू मांडली आहे.
वाईट बातमी! OXFORD कोरोना लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही
ऑक्सफर्ड कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्यातल्या चाचण्या सुरू असतानाच एका व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लशीचं ट्रायल तात्पुरत थांबवण्यात आलं आहे. अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca), ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) ने तयार केलेली ही लस. ज्यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचीही भागीदारी आहे. भारतातही या लशीचं ट्रायल सुरू आहे. त्या व्यक्तिच्या आजाराच्या कारणांचा शोध लागेपर्यंत ही चाचणी थांबणार आहे.