मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सूचना मिळताच 24 तासांत सुरू होणार लसीकरण; मुंबईत कोरोना लशीसाठी अशी झाली जय्यद तयारी

सूचना मिळताच 24 तासांत सुरू होणार लसीकरण; मुंबईत कोरोना लशीसाठी अशी झाली जय्यद तयारी

मुंबईत कुठल्या ठिकाणी कोरोना लस मिळणार, कुणाला आणि कशी दिली जाणार याचा पूर्ण आराखडा तयार आहे. कुठल्या रुग्णायांमध्ये उपलब्ध असेल लस जाणून घ्या Corona Vaccination बद्दल सर्व काही

मुंबईत कुठल्या ठिकाणी कोरोना लस मिळणार, कुणाला आणि कशी दिली जाणार याचा पूर्ण आराखडा तयार आहे. कुठल्या रुग्णायांमध्ये उपलब्ध असेल लस जाणून घ्या Corona Vaccination बद्दल सर्व काही

मुंबईत कुठल्या ठिकाणी कोरोना लस मिळणार, कुणाला आणि कशी दिली जाणार याचा पूर्ण आराखडा तयार आहे. कुठल्या रुग्णायांमध्ये उपलब्ध असेल लस जाणून घ्या Corona Vaccination बद्दल सर्व काही

मुंबई, 2 जानेवारी: देशात दोन कोरोना लशींच्या (Covid-19 Vaccine) आपत्कालीन वापरास (Emergency use) मंजुरी मिळाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली Covishield (Coronavirus vaccine) लस आणि आज मंजुरी मिळालेली स्वदेशी Covaxin ही भारत बायोटेकने तयार केलेली लस आता भारतात उपलब्ध करून देण्यात येईल. साठा मिळताच अवघ्या 24 तासांच्या पूर्व सूचनेने मुंबईत लसीकरण सुरू होऊ शकतं, इतकी तयारी झाली असल्याचं महापालिकेने सांगितलं आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरं) सुरेश काकाणी यांनी आज (दिनांक 2 जानेवारी ) प्रादेशिक लस साठवणूक केंद्रासह विविध रुग्णालयात निर्मित लसीकरण केंद्रांना देखील भेट दिली. तांत्रिक बाबींची पूर्तता, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण यासह निरनिराळ्या बाबींवर आवश्यक त्या सूचना दिल्य आणि लसीकरण तयारीचा आढावा घेतला.

लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या पूर्व सूचनेने प्रत्यक्ष लसीकरण सुरू करता येईल, इतकी सुसज्जता महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे, असं काकाणी यांनी सांगितलं. लसीकरण पूर्व तयारीमध्ये कोणतीही उणीव, कमतरता राहू नये, ह्याची पुन्हा खातरजमा करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

कुठे होणार लसीकरण?

लसीकरणासाठी परळच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्ल्याचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही 8 लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. Covid-19 लसीकरणासाठी S विभागातील कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 5000 चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस साठवणूक केंद्र (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Mumbai