मुंबई, 11 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वांनीच कोरोनाव्हायरसचा धसका घेतला आहे. अशात आता कोरोनाव्हायरसबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणं महागात पडू शकतं. कोरोनाव्हायरसबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असं पत्र मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिलं आहे. हे वाचा - BREAKING : धोका वाढला! कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; संख्या 26 वर या पत्रात नमूद केल्यानुसार, ‘कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आरोग्य व्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र काही व्यक्तींद्वारे चुकीची माहिती, चुकीची सूचना, चुकीची परिपत्रके व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटर इत्यागींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पसरवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.’ ‘त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 54 अंतर्गत सामाजिक प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने कोरनाव्हायरससंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात आपण तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत’, अशी सूचना पालिका आयुक्तांनी दिली आहे. देशात कोरोनाची आपत्ती केंद्र सरकारने कोरोनाव्हायरसला आपत्ती (Notified Disaster) घोषित केलं आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. राज्याच्या डिजास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत (Disaster Response Funds - SDRF) मदत म्हणून निधी दिला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबाचा समावेश आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी कायदा कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता देशात साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic diseases act) लागू करण्यात आला आहे. 123 वर्ष जुना हा कायदा आहे. एखाद्या आजाराला आळा घालण्यात सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील, तेव्हा हा कायदा लागू केला जातो. राज्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार दिले जातात.
#COVID19, which has claimed over 5,000 lives across the world, is less than six months old, but to combat the pandemic, the Centre has invoked a 123-year-old #EpidemicDiseasesAct, which has been historically used to contain the spread of #swineflu, #cholera, #malaria and #dengue. pic.twitter.com/dLfh1Niquz
— IANS (@ians_india) March 14, 2020
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 84 आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 26 रुग्ण आहेत. पुण्यात 10, मुंबई 5, नागपुरात 4, यवमाळमध्ये 2, ठाणे-कल्याण-पनवेल-नवी मुंबई आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हे वाचा - ‘कोरोना’बद्दल सरकारचा निर्णय डावलून भरवली यात्रा,साताऱ्यात पहिला गुन्हा दाखल