सातारा, 14 मार्च : जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आता महाराष्ट्रातही हैदौस घातला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारने उपायोजना जाहीर करण्यात आल्या आहे. मात्र, साताऱ्यात शासकीय उपाययोजनेत अडथळा निर्माण केल्याने पहिला गुन्हा दाखल झाला आहे. साताऱ्यातील बावधन यात्रा समितीवर राज्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन यात्रा संयोजन समितीने पोलीस विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिनांक 12 ते 13 मार्च रोजी यात्रेचे आयोजन केले होते. छबिना कार्यक्रमात आणि बगाड पाहण्यासाठी बावधन गावामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी जमा केली. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण केला. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन शिवाजीराव जाधव यांनी तक्रार दाखल केल्यामुळे भारतीय दंड विधान संहिता कलम 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष राजेंद्र आबाजी भोसले, उपाध्यक्ष दीपक दीलीप ननावरे, सचिव अंकुश जगन्नाथ कुंभार, खजिनदार सचिन आप्पासो भोसले, सदस्य संभाजी शिवाजी दाभाडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; संख्या 26 वर राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या 26 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं. कुठल्या शहरात किती रुग्ण? पुणे - 10 मुंबई - 5 नवी मुंबई - 1 कमोठे रायगड- 1 नागपूर - 4 यवतमाळ - 2 कल्याण -1 ठाणे -1 अहमदनगर - 1 31 मार्चपर्यंत राज्यातल्या सगळ्या शाळा बंद कोरोना व्हायरस (Coronavirus) राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. थिएटर, जिमही बंद सर्व सरकारी कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. राज्यातल्या काही शहरांमध्ये जिम आणि थिएटरही बंद ठेवण्यात आली आहेत. आदेश न पाळणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.