Home /News /mumbai /

Coronavirus पश्चिम महाराष्ट्रात पसरला, 8 नव्या रुग्णांसह संख्या 97 वर

Coronavirus पश्चिम महाराष्ट्रात पसरला, 8 नव्या रुग्णांसह संख्या 97 वर

मात्र सॅनिटायझरचा अती वापर केल्यास त्वचेचे विकास झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

मात्र सॅनिटायझरचा अती वापर केल्यास त्वचेचे विकास झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून या नव्या केसेस समोर आल्या आहेत. सांगलीत 4 कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे.

  मुंबई, 23 मार्च : Coronavirus चा धोका महाराष्ट्रात वाढतोच आहे. सोमवारी संध्याकाळी आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून या नव्या केसेस समोर आल्या आहेत. सांगलीत 4 कोरोनाबाधित रुग्ण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाव्हायरसशी मुकाबला करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. संध्याकाळपासूनच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण त्याबरोबरच या विषाणूचा प्रसार आता मोठ्या शहरांपासून महाराष्ट्राच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरत चालल्याचं उघड होत आहे. सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या नव्या केसेसमुळे आता राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 वर पोहोचली आहे. यात 3 रुग्ण मुंबईत सापडले आहेत तर बाकीच्या पॉझिटिव्ह केसेस सांगली आणि साताऱ्यातील आहेत. महाराष्ट्रात 8 नवे रुग्ण मुंबई - 3 सांगली 4 सातारा - 1 सांगलीतले चारही रुग्ण सौदी अरेबियातून आलेले सांगलीमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत.हे चारही देवदर्शनासाठी सौदी अरेबिया येथे गेले होते.या चौघांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हे चारही प्रवासी वाळवा तालुक्यातील आहेत.तर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्राला धडक दिली आहे. रुग्णांचा रोज नवा आकडा समोर येत आहे. महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल 24 रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 97 वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला कठोर निर्णय घेणं गरजेचं झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली आहे. कोरोनाग्रस्त महिलेचा पुणे ते वेल्हा गावापर्यंत प्रवास, तब्बल 26 गावं क्वारंटाइन

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या