जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मला 3 वर्षाची मुलगी आहे, माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहे' पोलिसांचा भावनिक VIDEO व्हायरल

'मला 3 वर्षाची मुलगी आहे, माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहे' पोलिसांचा भावनिक VIDEO व्हायरल

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाविरोधात लढ्यात लोकांनी घरीच बसावं, अशी विनंती वारंवार सरकारकडून केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बब्बू शेख, प्रतिनिधी मनमाड, 04 एप्रिल : ‘मला 3 वर्षाची मुलगी आहे…माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहे…माझी पत्नी माझ्या काळजात आहे तरी मी तुमच्या साठी घरा बाहेर आहे..तुम्ही घरात राहा सुरक्षित राहा’ असे पोश्टर हातात घेऊन  मालेगाव पोलीस जनजागृती करत आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात हैदोस घातला आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढलले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे जास्त होतो. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचं आहे.

जाहिरात

त्यासाठी अगोदर जमावबंदीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, या दोन्ही बंदीला न जुमानता नागरिक मोठ्या संख्येनं घरा बाहेर पडत आहे. कोरोनाविरोधात लढ्यात लोकांनी घरीच बसावं, अशी विनंती वारंवार सरकारकडून केली जात आहे. यासाठी मालेगाव मधील पोलिसांनी आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. हेही वाचा - कोरोनाला हरवणारे खरे योद्धा, आईच्या मृत्यूचा फोन आला तरी धरती मातेसाठी लढली गर्दी करू नका, घरात राहा, सुरक्षित राहा.. आम्हालाही कुटुंब आहे, मुलं आहे, माझी 3 वर्षाची मुलगी आहे, माझी पत्नी माझ्या काळजात आहे. माझ्या घरी वृद्ध आई-वडील आहे, तरी देखील आम्ही तुमच्या सरंक्षणासाठी त्यांची परवा न करता घरा बाहेर आहोत. हातात असे पोश्टर घेऊन मालेगावच्या चौका-चौकात पोलीस उभे असून  घरात राहा बाहेर पडू नका, असे  ते नागरिकांना भावनिक आवाहन कर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला असून त्याचा परिणाम देखील होत आहे. खरं पाहता कोरोना सारख्या लढ्यात डॉक्टर एकीकडे लढा देत आहे, तर दुसरीकडे पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून लोकांना थांबवण्यासाठी रस्त्यावर पहारा देत आहे. त्यामुळे, घरीच राहा आणि कोरोनाला मात द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात