जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात रुग्णांची संख्या वाढली; पुणे, बुलढाण्यात 2-2 तर मुंबईत एक नवा रुग्ण

राज्यात रुग्णांची संख्या वाढली; पुणे, बुलढाण्यात 2-2 तर मुंबईत एक नवा रुग्ण

सतत सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबनाने स्वच्छ हात धुतल्यास तेही तेवढच परिणामकारक ठरू शकतं.

सतत सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबनाने स्वच्छ हात धुतल्यास तेही तेवढच परिणामकारक ठरू शकतं.

राज्यात सोमवारी कोरोनाव्हायरसमुळे 2 रुग्णांचे मृत्यू झालेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला. कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. आज लॉकडाउनचा 7 वा दिवस आहे, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.

जाहिरात

कोरोनामुळे सोमवारी दोन जणांचा मृत्यू राज्यात सोमवारी कोरोनाव्हायरसमुळे 2 रुग्णांचे मृत्यू झालेत. मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात 78 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. राज्यातील 39 रुग्णांची तब्येत बरी झाली, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तू प्लीज घरी ये, पत्नीनं नकार म्हणून लॉकडाऊनमध्ये तरुणानं केली आत्महत्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात