राज्यातील कोरोनाचा विळखा सैल होतोय; गेल्या चार दिवसांत सव्वा 2 लाख रुग्णांची करोनावर मात

राज्यातील कोरोनाचा विळखा सैल होतोय; गेल्या चार दिवसांत सव्वा 2 लाख रुग्णांची करोनावर मात

Maharashtra Corona news: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत असल्याचं दिसत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus 2nd wave) अक्षरश: थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (Covid patients number increasing) असल्याने आरोग्य यंत्रणा सुद्धा अपुऱ्या पडत आहेत. मात्र, असे असताना आता महाराष्ट्राला एक दिलासा (relief for Maharashtra) देणारी बातमी समोर आली आहे. कारण, गेल्या चार दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे तर बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे.

आज राज्यात 65,934 रुग्णांनी कोरोनावर मात (65,934 patients discharged) केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 41,07,092 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के इतके झाले आहे. रिकव्हरी रेट सुद्धा सातत्याने वाढत आहे आणि ही महाराष्ट्रासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे.

चार दिवसांत 2,38,116 रुग्णांची कोरोनावर मात

1 मे - 61,326 रुग्ण करोनामुक्त

2 मे - 51356 रुग्ण कोरोनामुक्त

3 मे - 59,500 रुग्ण कोरोनामुक्त

4 मे - 65,934 रुग्ण कोरोनामुक्त

धक्कादायक आकडा! Lockdown निर्बंधांमुळे एप्रिलच्या एका महिन्यात देशभरात 75 लाख जणांच्या नोकऱ्यांवर गदा

आज राज्यात 51,880 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णवाढीला सुद्धा ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. सध्या राज्यात 6,41,910 सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या चार दिवसांतील बाधितांची संख्या

1 मे - 61,282 नवीन रुग्णांचे निदान

2 मे - 56,647 नवीन रुग्णांचे निदान

3 मे - 48,621 नवीन रुग्णांचे निदान

4 मे - 51,880 नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात 891 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 397 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 258 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 236 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के इतका आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 4, 2021, 10:10 PM IST

ताज्या बातम्या