• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईतल्या कोरोना लसीकरणाचं Reality Check: खाजगी रुग्णालयांत लस प्रत्यक्षात मिळणार तरी कधी?

मुंबईतल्या कोरोना लसीकरणाचं Reality Check: खाजगी रुग्णालयांत लस प्रत्यक्षात मिळणार तरी कधी?

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी एकूण 29 खाजगी रुग्णालयांची (Hospitals in mumbai giving corona vaccine) यादी सोशल वेबसाईटवर टाकली खरी, पण प्रत्यक्षात फार थोड्या रुग्णालयांची त्या दृष्टीने तयारी झालेली आहे.

  • Share this:
मुंबई, 4 मार्च:  बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहणारे 69 वर्षाचे यतीन शहा आज सकाळीच बोरिवलीतील करुणा रुग्णालयात पोहोचले. करुणा रुग्णालयात लसीकरण केलं जाणार आहे याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे घरापासून दूर कशाला जा या जवळच्याच खाजगी रुग्णालयात अडीचशे रुपये (Cost of Corona vaccine in private hospital) का होईना पण ते भरून जर पटकन लस मिळणार असेल म्हणून ते आपल्या पत्नीसोबत सकाळी साडे आठ वाजताच पर्यंत पोहोचले खरे पण त्यांना रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच अडवण्यात आलं आणि अजूनही लसीकरणाला सुरुवात झाली नसल्यानं आणि ती कधी होणार आहे याची माहिती नसल्याने त्यांना परत परत जाण्यास सांगितलं बिचाऱ्या त्यांच्या हिरमुसले आणि आपल्या पत्नी सोबत घरी परत निघून गेले. मुंबईच्या लसीकरण (Corona vaccination drive Mumbai) मोहिमेच्या Reality check चं हे एक उदाहरण. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना लसीकरणाने मात्र हवा तसा वेग अजूनही घेतलेला नाही. नागरिकांना लस हवी आहे, पण लसीकरण केंद्रात आणि अॅपवर, नोंदणीमध्ये बरंच गोंधळाचं वातावरण आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी एकूण 29 खाजगी रुग्णालयांची (Hospitals in mumbai giving corona vaccine) यादी सोशल वेबसाईटवर टाकली आणि या खाजगी रुग्णालयात मुंबईकरांना लसीकरणाची संधी मिळणार असल्याचं जाहीर केलं. मग हे बोरिवलीसारखंच चित्र बघायला मिळालं. एक तर लोक थेट रुग्णालयात पोहोचले किंवा मग त्यांनी फोन करून विचारणा केली. पण 29 पैकी 26 रुग्णालयांमध्ये विचारणा केल्यानंतर आज नाही तर गुरुवारी किंवा त्यानंतर पुढच्या आठवड्यात हे लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तीन लसीकरण केंद्र ही पहिल्या दिवसापासूनच सुरू असल्याने तिथे लसीकरण सुरळीत सुरू आहे; पण ही 26 लसीकरण केंद्र कधी सुरू होणार याबद्दल मात्र कोणीही स्पष्ट माहिती देऊ शकले नाही. कोव्हॅक्सिन-कोव्हिशिल्ड लशींचे साइड इफेक्ट्स आणि कुणी घेऊ नये लस? वाचा सविस्तर करुणा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर रवींद्र भटनागर यांच्या मते, बुधवारी सकाळपर्यंत पालिकेकडून कोणतीही अधिकृत सूचना या संदर्भात प्राप्त झाली नाही पण आम्ही करुणा संसर्गाच्या काळात अकराशे होऊन ही अधिक लोकांना उपचार केलेत लसीकरणाचे केंद्र म्हणून आमची निवड झाली असली तरी आम्हाला तयारी करायला वेळ लागणार आहे आणि सोमवारपासूनच आम्ही ही लसीकरण सुरू करू शकतो असं त्यांनी सांगितलं. खरं तर मुंबईतील 53 रुग्णालयांची संघटना खाजगी रुग्णालयांची संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्स ने राज्य सरकारला प्रेझेंटेशन देत रुग्णालयांनी काळामध्ये पेशंटला पेशंटवर उपचार केलेले आहेत अशांना लसीकरण करण्याची मुभा मागितली होती. त्यांना ही मुभा दिली असली तरी अजूनही तयारी करायला त्यांना वेळ हवाय. लगेच कुठून लस येणार, किती डोस येणार, कशा पद्धतीने लसीकरण करायचं या सगळ्याची माहिती त्यांना हवी आहे. त्याचबरोबर प्रत्येक हॉस्पिटल मध्ये किती लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे याबद्दलची माहितीही किंवा प्रोटोकॉल ही त्यांना मिळाला नव्हता. म्हणून वेळ लागतोय, अशी माहिती दिली गौतम खन्ना यांनी दिली. गौतम खन्ना हे असोसिएशन ऑफ हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत. गौतम खन्ना पुढे म्हणाले की, 'आणखी आठ ते दहा रुग्णालयांची यात वाढ होणार आहे. सध्या ही 29 रुग्णालयं जरी असली तरी आणखी रुग्णालयांनी मागणी केली आहे की आमच्याकडेही अशा पद्धतीने लसीकरण केलं जावं. मंगळवारी रात्री उशिरा निर्णय आल्यानं तयारी करायला आम्हाला वेळ लागणार आहे काही ठिकाणी गुरुवारी सुरू होऊ शकतो. तर काही रुग्णालय अधिक वेळ पण घेऊ शकतात.' 29 रुग्णालयांच्या या यादीत लिलावाची रुग्णालय पी डी हिंदुजा रुग्णालय होली फॅमिली रुग्णालय जसलोक रुग्णालय भाटिया रुग्णालय बॉम्बे रुग्णालय एच एन रिलायन्स रुग्णालय सर्वोदय रुग्णालय ब्रीच कँडी रुग्णालय टाटा रुग्णालय ग्लोबल रुग्णालय घाटकोपर मधील हिन्दू सभा रुग्णालय मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालय महालक्ष्मी मधील एस आर सी सी रुग्णालय अशा रुग्णालयांचा समावेश आहे. मागच्या दोन दिवसात मुंबईतल्या सगळ्याच लसीकरण केंद्रावर जी गर्दी झाली त्याच्यामागे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे रजिस्टेशन न करता येणारे लाभार्थी म्हणजे जना वॉकिंग लाभार्थी म्हटलं जातं अशा लोकांची संख्या खूप जास्त होती यांची माहिती गोविंद वेबसाईटमध्ये भरणं म्हणजे स्थाना रजिस्ट्रेशन करणं आणि अनेकदा सर्वर डाऊन होणार यामुळे बराच वेळ लागत होता परिणामी काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती जसं गोरेगाव नेस्को सेंटर बीकेसी चा जम्बो कोबड केअर सेंटर अनेक ठिकाणी गर्दी झाली होती ते पाहता पी डी हिंदुजा रुग्णालय व ठरवलेला आहे की ज्या  लाभार्थ्यांचा रजिस्ट्रेशन झालं नाही अशांना रजिस्ट्रेशन करून एक ठराविक वेळ द्यायची आणि त्यांना दुसर्‍या किंवा त्यानंतर च्या दिवशी बोलवायचं जेणेकरून लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि सामाजिक अंतर पाळत जावं.

कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रात क्षमतेपेक्षा अधिक लाभार्थी पोहोचत असल्याने फक्त प्रणालीवर ताण पडत नाहीये तिथे काम करणार्‍या कर्मचारी आणि डॉक्टरांवर अधिक ताण पडतो आहे बीकेसी मधली क्षमता आहे साधारण ताप पंधराशे लाभार्थ्यांची प्रति दिवस पण एक दिवशी ते 2300  लोकांना लसीकरण करणयात आलं. दोन दिवसांत मुंबईत 60 वर्षावरील अधिक आणि सहव्याधी असलेल्या 7985 जणांना लसीकरण करण्यात आलं. तर आतापर्यंत एकूण 2लाख 41 हजार 747 जणांना लस देण्यात आली आहे
First published: