मुंबई, 13 ऑगस्ट: मुंबईचे (Mumbai Police) माजी पोलीस (Former Mumbai Police Commissioner)आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना लूक आऊट (Look Out Circular )नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन प्रकरणात ही लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. तसंच लूक आऊट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तक्रारारदार शरद अग्रवाल आणि सोनू जालान प्रकरणी नोटीस जारी केल्याची माहिती मिळाली आहे. परमबीर यांच्यासह 30 पेक्षा जास्त जणांना नोटीस जारी केल्याचंही समोर येत आहे.
Extortion case | Look Out Circular issued against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file photo): Thane Police Commissioner Jai Jeet Singh to ANI pic.twitter.com/BUT4GimcXA
— ANI (@ANI) August 13, 2021
परमबीर सिंह यांच्याविरुद्ध आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला असून सिंह यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34 ,120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या शिक्षणाधिकारी डॉ. झनकरांना अटक खंडणीचा गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा (Case Of extortion Registered) दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलीस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय.