धुळे, 3 जून : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत आज धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात (Maharashtra Congress) प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम येथील गांधी भवनमध्ये पार पडला काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. लोकांचा आता भाजपवरचा विश्वास उडाला असून काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे, हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून भारतीय जनता पक्षानं खोटी स्वप्नं दाखवून देशाला अधोगतीकडं नेण्याचं काम केले आहे. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशानं उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानानं फडकत राहील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. हे वाचा - मित्रांच्या मदतीनं तयार केले प्रेयसीचे व्हिडिओ, Blackmail करत सर्वांनी केले सामुहिक अत्याचार या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री के. सी, पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, देवानंद पवार, प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विधीमंडळ पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरू असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







