Home /News /mumbai /

VIDEO: महाविकास आघाडीत पुन्हा मानापमान नाट्य; काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अनिल परबांवर संतापले

VIDEO: महाविकास आघाडीत पुन्हा मानापमान नाट्य; काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अनिल परबांवर संतापले

मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई, 8 मे: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi)मध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचं (Mumbai Vaccination center inauguration) आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (MLA Zeeshan Siddique) हे चांगलेच संतापले आहेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. काय म्हणाले आमदार झिशान सिद्दीकी? झिशान सिद्दीकी म्हणाले, मी ज्या विधानसभा क्षेत्रातून आमदार आहे त्या वांद्रे पूर्व विभागात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार आहे मात्र, मला आमंत्रण देण्यात आले नव्हते. शिवसेनेचे मंत्री अनिल परब होते, माजी महापौर आणि ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली त्या विश्वनाथ महाडेश्वर यांना बोलावण्यात आलं होतं. इतर नगरसेवक, वॉर्ड अधिकारी होते. मात्र, आमदाराला बोलावणं त्यांना गरजेचं वाटलं नाही. वाचा: शरद पवारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र; उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी अनिल परबांवर गंभीर आरोप अनिल परब हे करत आले आहेत. यापूर्वी सुद्धा मी जे काही काम करत असेल त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात. बीएमसी कधी एनओसी देत नाही, कधी उशीरा देतात. जे काही काम मी करण्याचा प्रयत्न करतो त्यात बाधा टाकण्याचा प्रयत्न होतो, मला या दहशतीची सवय आहे. मी काम करत आलो आहे आणि करत राहणार. वांद्रे पूर्व मतदारसंघातील नागरिकांना माहिती आहे की कोण खरोखर काम करतं. अनिल परब हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी समजून घ्यायला हवं की नागरिकांनी मला निवडून दिलं आहे आणि मला काम करुन द्यायला हवं अशी प्रतिक्रिया आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे. झिशान सिद्दीकी यांच्या नाराजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे हे सरकार आहे या सरकारमधील घटक पक्ष आहे त्यांचा सन्मान व्हायला हवा. सिद्धीकी यांनी जे काही म्हटले आहे ते चुकीचे नाही आपल्या राज्यात परंपरा पाळली गेली आहे. ज्या विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमाचे तिथल्या स्थानिक आमदारला त्या कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी करायला हवा असं राज्यात धोरण आहे. मात्र जर एखादा मंत्री जात असेल आणि त्या ठिकाणी आमदाराला बोलवत नसतील तर चुकीचं आहे. ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी यामध्ये भविष्यात अशा पद्धतीची चूक होऊ नये याबाबत सुधारणा करावी ही त्यांना विनंती आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Congress, Corona vaccine, Shiv sena

पुढील बातम्या