मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'...तर मुंबईत दिवसाला 10 हजार रुग्ण आढळतील', कोरोना स्थितीबाबत आयुक्तांचा इशारा

'...तर मुंबईत दिवसाला 10 हजार रुग्ण आढळतील', कोरोना स्थितीबाबत आयुक्तांचा इशारा

दिवसेंदिवस मुबंईत कोरोना विषाणूचे रुग्ण वाढतच (Corona patient in mumbai) चालले आहेत. त्यामुळे याचा ताण मुंबई प्रशासनावर पडत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीबाबत (preparations made by BMC) आयुक्तांनी माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 मार्च: दिवसेंदिवस मुबंईत कोरोना विषाणूचे (Corona Patient in Mumbai) रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे याचा ताण मुंबई प्रशासनावर पडत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीबाबत आयुक्तांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की मुंबईत दररोज 50 हजार कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. ज्यामध्ये जवळपास सात हजार नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत दररोज 60 हजार कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना चाचण्याची क्षमता वाढवली तर, मुंबईत दिवसाला नऊ ते दहा हजार रुग्ण वाढतील. त्यामुळे याचा ताण प्रशासनावर पडेल. मात्र दिवसाला 10 हजार नवे रुग्ण आढळले, तरी तो ताण मुंबई प्रशासन सहजपणे पेलू शकते, त्यासाठी रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत. मुंबई सध्या एकूण 13000 खाटा उपलब्ध असून त्यापैकी साडेनऊ हजार खाटा वापरात आहेत. त्यातही दीड हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील म्हणजेच एम एम आर विभागातील आहेत.

(हे वाचा-वयोवृद्ध कोरोना रुग्णाची आत्महत्या, नागपूरातील घटनेने खळबळ)

सध्या मुंबईत तीन हजार बेड रिकामे असून येत्या काळात काही खाजगी रुग्णालयांकडून खाट्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत आणखी 7000 खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे खाटासाठी कोणत्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही. ‌पण नागरिकांनी ठरवून दिलेली यंत्रणा मोडीत काढू नये आणि चाचणीचा अहवाल घेऊन खाटासाठी धावपळ करू नये, असा सल्लाही आयुक्तांनी यावेळी दिला आहे.

(हे वाचा -'...तर मुंबईत दिवसाही कडक निर्बंध लावण्यात येणार', पालकमंत्र्यांचा गंभीर इशारा)

याव्यतिरिक्त खाजगी लॅबने कोरोनाचा रिपोर्ट आधी महापालिकेला द्यावा, त्यानंतर महापालिका पॉझिटिव्ह रुग्णाची घरी जावून तपासणी करेल आणि आवश्यक असेल तरच त्यांना रुग्णालयात भरती केलं जाईल. परंतु नागरिकांनी स्वतः फोन करून बेडची मागणी केल्यास संबंधित रुग्णाला बेड उपलब्ध करून देऊ नये, असा आदेशच मुंबई महापालिकेने दिला आहे. आयुक्तांनी पुढे सांगितलं की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असली तरी, त्यामध्ये लक्षणं नसणाऱ्या रुग्णांचा समावेश जास्त आहे. परंतु लक्षणं नसणारी लोकं बेजबाबदारपणे वागल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Mumbai