जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / बापरे! पोटातून 18 कोटींची कोकेन तस्करी; मुंबई विमानतळावरून दोघांना अटक, NCB ची मोठी कारवाई

बापरे! पोटातून 18 कोटींची कोकेन तस्करी; मुंबई विमानतळावरून दोघांना अटक, NCB ची मोठी कारवाई

पोटातून कोकेनची तस्करी करणाऱ्या दोघांना NCB ने अटक केली आहे. (File Photo)

पोटातून कोकेनची तस्करी करणाऱ्या दोघांना NCB ने अटक केली आहे. (File Photo)

पोटातून कोकेनची तस्करी (Cocaine smuggling through stomach) करणाऱ्या दोन जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट: पोटातून कोकेनची तस्करी (Cocaine smuggling through stomach) करणाऱ्या दोन जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) अटक केली आहे. संबंधित दोघांवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार करून त्यांच्या पोटातील 18 कोटी रुपयांचं कोकेन जप्त (Cocaine worth Rs 18 crore seized) करण्यात आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारावर NCB  च्या पथकानं ही कारवाई केली आहे. संबंधित दोन्ही आरोपी विदेशी नागरिक असून आंतरराष्ट्रीय ड्रग्स पुरवठा करणाऱ्या टोळींशी त्यांचा संबंध आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कितेवाना वरदा रमधानी आणि फुमो इमानुभव झेडेक्यूमस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्या दोघांकडून सुमारे 18 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. टांझानिया येथून एक महिला पोटात कोकेनच्या कॅप्सूल घेऊन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गेल्या आठवड्यात कितेवानाला ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. जेजे रुग्णालयात उपचार करून तिच्या पोटातून 66 कोकेनच्या कॅप्सूल जप्त करण्यात आले होते. याची बाजारातील किंमत तब्बल 8 कोटी रुपये इतकी आहे. हेही वाचा- पिंपरी: लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्यानं घेतला तरुणाचा जीव;शहराध्यक्षाला अटक दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी मोझांबी देशाचा रहिवासी असणाऱ्या फुमो इमानुभव झेडेक्यूमसला एनसीबीनं अटक केली होती. अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यानंतर फुमोनं आपल्या पोटात कोकेन असल्याची माहिती एनसीबीला दिली. यानंतर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीनं आरोपीला जेजे रुग्णालयात दाखल करत पोटातून तब्बल 70 कॅप्सूल काढले आहेत. पोटातून काढलेल्या या 70 कॅप्सूलची बाजारातील किंमत तब्बल 10 कोटी रुपये इतकी आहे. हेही वाचा- आजीनं केलेला अपमान जिव्हारी, तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर खरंतर, लॉकडाऊननंतर कोकेन तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विविध पद्धतींचा वापर करत अमलीपदर्थांची तस्करी केली जात. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या टोळ्या कोकेन तस्करी करण्यासाठी महिलांचा वापर करताना दिसत आहेत. यासाठी गरीब देशातील महिलांना निवडलं जात आहे. अगदी काही हजार किंवा लाखभर रुपयांसाठी या महिला कोकेन तस्करी करण्यासाठी होकार देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात