Home /News /mumbai /

धर्मवीर आनंद दिघे चित्रपट संपत असताना मुख्यमंत्री आले बाहेर, सांगितलं भावनिक कारण...

धर्मवीर आनंद दिघे चित्रपट संपत असताना मुख्यमंत्री आले बाहेर, सांगितलं भावनिक कारण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आनंद दिघे यांच्यावर जीवन प्रवासावर आधारीत 'धर्मवीर आनंद दिघे' हा चित्रपट पाहिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आनंद दिघे यांच्यावर जीवन प्रवासावर आधारीत 'धर्मवीर आनंद दिघे' हा चित्रपट पाहिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारीत 'धर्मवीर आनंद दिघे' हा चित्रपट पाहिला.

    मुंबई, 15 मे - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनप्रवासावर आधारीत धर्मवीर आनंद दिघे (dharmavir anand dighe) हा चित्रपट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी सहपत्नीक रश्मी ठाकरे यांच्यासह पाहिला. पण, चित्रपटाचा जेव्हा शेवट आला होता, तेव्हा उद्धव ठाकरे बाहेर आले होते. आपण चित्रपट पूर्ण का नाही, पाहिला याचे उत्तर दिल्यानंतर उपस्थितीत शिवसैनिकांना गहिवरून आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारीत 'धर्मवीर आनंद दिघे' हा चित्रपट पाहिला. आयनॉक्समध्ये या चित्रपटाचे खास आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे सोबत होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'आनंद दिघे चित्रपट फार सुंदर आहे, खासकरून अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांचा जो अभिनय केला आहे तो फारच जबरदस्त आहे. मला माहित नाही के प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या ज्या लकबी होत्या, त्या हुबेहुब साकारल्या आहेत. मी जाणून बुजून चित्रपटाचा शेवट नाही पाहिला. तो फारच त्रासदायक आहे, जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वतः बाळासाहेब देखील फार भावुक झाले होते.त्याचे वर्णन नाही करू शकतं', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. (परभणीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा, 100 पेक्षा जास्त नागरीक रुग्णालयात दाखल) याआधीही ०७ मे रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. (वेबविश्वाला हादरवून टाकणारा तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीचा 'रानबाजार') 'आनंद दिघे यांचं नाव घेतल्यावर सगळे दिवस आठवत आहे. बाळासाहेब हे आनंद दिघे यांच्यावर रागवले असायचे आणि नेहमी असायचे. ही परंपरा ठाणेकरांनी राखली आहे. सकाळी 11 ची वेळ दिली. किती वाजता यायचे तेव्हा ११ वाजलेले असायचे. बाळासाहेब ठाकरे हे वेळ पाळणारे होते. आनंद दिघे यांना सकाळची 11 ची वेळ दिले असेल तर 2 वाजेपर्यंत त्यांचा काही पत्ता नसायचा. मग 2 वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे. हा गंमतीचा भाग वेगळा पण बाळासाहेबांसमोर उभे असल्यावर एका शब्दांने बोलायचे नाही. समोर आल्यानंतर राग वाहून जायचा आणि ते प्रेम पाहण्यास मिळालं' असा किस्सा उद्धव ठाकरेंनी सांगितला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या