मुंबई, 2 जून : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा (Maharashtra Corona) उद्रेक वाढायला लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात काल नव्या कोरोनाबाधितांचा आकडा थेट 1 हजाराच्या पार गेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तातडीने टास्क फोर्ससोबतची (Maharashtra Task Force) बैठक बोलावली. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत निर्बंधाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला नाही. पण त्यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :
टास्कफोर्सच्या बैठकीत कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांना सध्याच्या परिस्थतीविषयी माहिती दिली. नवा कोरोना व्हेरिएंट हा कितका घातक आणि संसर्गजन्य आहे याविषयी माहिती देण्यात आली. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने काय-काय उपाययोजना करता येतील याबाबत मंथन झालं. या बैठकीत राज्यात पुन्हा मास्कसक्ती करायची का? या विषयी देखील चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांचं मत ऐकून घेतल्यानंतर राज्यात सध्यातरी मास्कसक्तीची आवश्यकता नाही, असा निर्णय घेतला. पण मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलं. तसेच गर्दीमध्ये शक्यतो मास्क वापराच, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
कठोर नियमावसी नको असेल तर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पुढचे 15 दिवस हे कोरानाबाबत महत्वाचे असणार आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा पंधरा दिवस अभ्यास केला जाईल. पुढच्या 15 दिवसांनंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जातील. मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावावा, असं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं आहे.
पुढील आठ ते दहा दिवस महत्वाचे असणार आहेत. त्यानंतर आकडेवारी बघून मास्कसक्ती आणि इतर निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कडक निर्बंध नको असतील तर नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.