मुंबई, पुणेकरांसाठी असे असतील निर्बंध; मुख्यमंत्र्यांच्या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुंबई, पुणेकरांसाठी असे असतील निर्बंध; मुख्यमंत्र्यांच्या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप लोकल किंवा बस सेवा बंद करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : महाराष्ट्रात झपाट्याने कोरोना पसरत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप लोकल किंवा बस सेवा बंद करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहितीही दिली आहे.

भारतात कोरोनाव्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. देशात आतापर्यंत रुग्णांची संख्या 196वर पोहचली आहे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त 52 रुग्ण आहेत. एकीकडे महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 5 रग्ण बरे होत असून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

वाचा-महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या

1. लोकल आणि बसेस बंद नाही करणार. मात्र गर्दी कमी न झाल्यास हा निर्णय घेण्यात येईल.

2.अन्नधान्य, दूध, मेडिकल ही दुकाने सुरू राहणार.

3. सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के कर्मचारी.

4. वर्क फ्रॉम होम न करणाऱ्या खाजगी कंपन्या बंद कराव्यात

5. आर्थिक अडचणी भासू नयेत यामुळं सर्व बॅंका सुरू राहणार आहेत.

6. जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सर्व सेवा 31 मार्चपर्यत बंद

7. मुंबई-पुणे नागपुरात सर्व दुकाने बंद

8. सुट्टी समजून बाहेर फिरू नका. ही सुट्टी नव्हे स्वतः वर टाकलेली बंधन आहेत. सरकारला सहकार्य करा.

9. हातावर पोट असलेल्या लोकांचे वेतन बंद होणार नाहीत

10. पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 50वर

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे. तर यामुळे घाबरून न जाता काळजी घ्या, शक्य तितक्या वेळ घरी रागण्याचा प्रयत्न करा. आणि आरोग्यदायी रहा असं आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला दिलं आहे.

First published: March 20, 2020, 1:59 PM IST

ताज्या बातम्या