महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील  सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक  वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात राहण्याची वेळ आली आहे. सगळ्या देशातील पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाविरुद्ध जागतिक युद्ध सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्व लोक पुढे येत आहे. त्यांचे मी आभार मानतो. चित्रपटातील कलाकारांनी अत्यंत योग्यपणे जनजागृती करत आहे.

आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. यातून काही गोष्टी तुम्हाला खुपतील पण काही बदल करावे लागतील. बस आणि लोकल मुंबईचा श्वास आहे. पण बस आणि रेल्वे बंद होणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह प्रसारणातील महत्वाचे मुद्दे

- सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.

- जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे.

- अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.

- काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे 15-20 दिवस अत्यंत -महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे

- काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.

- अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार

- तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता. बँका सुरूच राहतील.

- खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे.

- या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.

- ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.

संपूर्ण देशभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्र सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना बरा होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 5 रग्ण बरे होत असून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर उपाय होत आहे ही बाब अत्यंत सकारात्मक आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे. तर यामुळे घाबरून न जाता काळजी घ्या, शक्य तितक्या वेळ घरी रागण्याचा प्रयत्न करा. आणि आरोग्यदायी रहा असं आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला दिलं आहे.

First published: March 20, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या