मुंबई, 2 एप्रिल : आज राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. नारायण राणे यांनी कायदा, सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. (Narayan Rane criticizes Thackeray government )
यावेळी भाजप नेते नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी उतावीळ आहेत. दोन्हीही पक्षांना लॉकडाऊन लावण्याची इच्छा आहे. मात्र मुख्यमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी या वाक्याचं पालन करण्यात फेल झाले आहेत. कारण त्यांच्या घरातलेच कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. दुसरीकडे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत ते म्हणाले की, अजूनही 18 हजार बेड्स कमी अशा बातम्या समोर येत आहेत. याचा अर्थ गेल्या वर्षात या सरकारने काय केलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा-'या' सरकारी टेलीकॉम कंपनीच्या नावावर मोठी फसवणूक, सरकारने केलं सावध!
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
-व्यापा-यांनी राज्यभर उठाव केला असून त्यांचा लाॅकडाऊन विरोध आहे.
-तुम्ही राज्य विकत घेतलंय का धमक्या द्यायला ?
-मी मातोश्रीत बसतो तुम्हीही बसा असं तुम्ही म्हणता. तुमची जेवायची सोय होते, बाकीच्यांचं काय ?
-दोन वेळचं जेवणाचे पॅकेज सरकार घरी पाठवणार आहे का ?
-महाराष्ट्र आर्थिक बाबतीत हे सरकार मागे गेलं आहे
-या सरकारमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे
-सगळे व्यवसाय कोलमडले आहे
-राज्यात सकाळी घरातून बाहेर पडलेला व्यक्ती संध्याकाळी घरी जाईल याची खात्री नाही.
- सचिन वाझेकडे १०० कोटी जमा करण्याची जबाबदारी होती. हा जनतेसाठी काम करत होता की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसाठी? वाझे निलंबित झाल्यावरही गुन्हे करत होता.
-वाझेसोबत हाॅटेलमध्ये सापडलेली बाई भाईंदरची, ती बाई वाझेसोबत काय करत होती हे सरकारला माहिती कसं नाही ?
-वाझेला शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा
-गाॅडफादर असल्याशिवाय अधिकारी असं काही करु शकत नाही
-प्रत्येक खात्याची चौकशी केली तर कोणतंही काम पैशांशिवाय होत नाहीये
-बाळासाहेबांच्या स्मारकांची जागा यांनी विकत घेतली आहे का ?
-निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नाही, ते नगरविकास खात्याचे मंत्री आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Narayan rane, Udhav thackarey