जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / क्या हुवा तेरा वादा.. म्हणत चित्रा वाघ यांचा जयंत पाटलांना टोला, चंद्रपूरची दारुबंदी रद्द केल्यावरून टीका

क्या हुवा तेरा वादा.. म्हणत चित्रा वाघ यांचा जयंत पाटलांना टोला, चंद्रपूरची दारुबंदी रद्द केल्यावरून टीका

क्या हुवा तेरा वादा.. म्हणत चित्रा वाघ यांचा जयंत पाटलांना टोला, चंद्रपूरची दारुबंदी रद्द केल्यावरून टीका

Chitra Wagh on lifting Liquor ban महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : चंद्रपूरमधली दारुबंदी (Chandrapur Liquor Ban) उठवण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. राज्यातील विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडूनही सरकारला प्रश्न विचारला जात आहे. याच मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करत, दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरून टीका केली आहे. (वाचा- ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात, फडणवीस म्हणाले, आता तरी नाकर्तेपणा सोडा! ) चित्रा वाघ यांनी जयंत पाटील यांचा राज्यातील भाजपची सत्ता असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सरकार आल्यावर यवताळला दारुबंदी करू असं आश्वासन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर या आश्वासनाचं काय झालं असा सवाल करताना चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. यवतमाळ राहिलं दूर, चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारनं असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

जाहिरात

(वाचा- पोलीस दल हादरलं, खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक ) जयंत पाटील यांचा चित्रा वाघ यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा विधानसभेतील आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाचा हा व्हिडिओ आहे. यात जयंत पाटील यांनी यवतमाळच्या महिला चळवळीच्या कार्यकर्त्यांना आम्ही आमची सत्ता आल्यावर दारुबंदीचं आश्वासन दिलं आहे, असं जयंत पाटील म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूरला दारुबंदी होते तर यवतमाळला का नाही, असा सवालही त्यांनी या व्हिडिओत केलेला पाहायला मिळत आहे. मात्र आता जयंत पाटील सत्तेत असलेल्या मंत्रिमंडळानंच चंद्रपूरची दारुबंदी उठवल्यानं चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळानं दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्यचे चंद्रपूरमधली दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. दारुबंदीमुलं वाढत असलेलं गुन्हेगारी आणि दारु तस्करीचं प्रमाण तसंच बुडणारा महसूल अशी कारण यासाठी देण्यात आली. पण यानंतर सरकारवर चोहोबाजुंनी टीका होत आहे. त्यात आता चित्रा वाघ यांनी केलेली ही टीका नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवणारी आहे. त्यामुळं त्याला प्रत्युत्तर काय मिळणार हे पाहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात