गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 दिवसांत घेणार मोठा निर्णय!

गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 दिवसांत घेणार मोठा निर्णय!

कोरोनाचं संकट पाहाता गणेशोत्सव आपण साधेपणाने साजर करू, गणेशमूर्तीबाबतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • Share this:

मुंबई 20 जून: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे सण आणि उत्सव कसे साजरे करायचे असा सगळ्यांनाच प्रश्न पडला. ईद आणि आषाढी वारीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता सगळ्यांनाच चिंता आहे ती गणेशोत्सवाची. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी चर्चा केली. कोरोनाचं संकट पाहाता गणेशोत्सव आपण साधेपणाने साजर करू, गणेशमूर्तीबाबतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याबाबत दोन दिवसांमध्ये ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहीजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत. मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नंहर्ताही आपल्याकडे पहात असेल की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.

गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहीजे. होळी नंतर हे संकट सुरू झालंय. त्यानंतर सर्वच धर्मियांनीही काळजी घेत सहकार्य केलंय. वारी आपण सुरक्षित पार पाडतोय तसंच आपण गणेशोत्सवही सुरक्षित पार पडला पहीजे असं आवाहन त्यांनी केलं.

सूर्यग्रहण पाहायचं असेल तर ही काळजी घ्या, महाराष्ट्रात असं दिसेल ग्रहण!

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणे करून सुरक्षेचे इतर प्रश्नंही सुटतील. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या रहातील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहीजे. गणेशमूर्ती एव्हढ्या उंचीची असावी जेणे करून ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जीत करता येईल.

Miss You: 'या' क्रिकेटपटूंनी पूर्ण केलं आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पण...

'या वर्षी आपल्या गणेशमूर्तीची उंची कमी करून आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात.' 'गणेशमूर्तींची उंची किती असावी या संदर्भात मी आपल्या सर्वांशी बोललोय तसेच आता मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्याशी बोलून पुढील दोन दिवसांत गणेश मूर्तींची उंची किती असावी हा निर्णय जाहीर करतो. असंही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यामुळे गणेशोत्सव आणि गणेशमूर्तीबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

 

First published: June 20, 2020, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading