मुंबई, 29 नोव्हेंबर: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) मुंबईत दाखल झाल्यानंतर घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. होमगार्डचे संचालक असणारे परमबीर सिंग सोमवारी सकाळी आपल्या कार्यालयात दाखल झाले आहेत. मात्र मुख्य खुर्चीवर न बसता परमबीर सिंग कार्यालयातील विझीटर खुर्चीवर बसलेत. दरम्यान, परमबीर सिंग आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी, परमबीर यांच्याविरुद्ध चांदीवाल आयोगाने काढलेले वॉरंट रद्द केले. आणि त्यांना एका आठवड्यात मुख्यमंत्री करोना सहाय्यता निधीत १५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
परमबीर सिंग यांनी आयोगा समोर प्रतिज्ञापत्र सादर केलय. “मला जे पुरावे द्यायचे आहेत ते पुरावे दिलेत, आता माझ्याकडे या आयोगाला सांगण्या करता काही नाहीये. मला काहीही पुरावे द्यायचे नाहीयेत आणि मला कोणाचीही उलट तपासणी करायची नाहीये''. असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, सिंग यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आयोगा समोर हजर न राहण्याची मुभा द्यावी असी मागणीदेखील परमबीर सिंग यांनी केली आहे.
त्यानंतर चांदीवाल आयोगाने काढलेले वॉरंट रद्द केले. आणि त्यांना एका आठवड्यात मुख्यमंत्री करोना सहाय्यता निधीत १५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले.
परमबीर सिंग आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी सचिन वाझे आणि त्यांचा आमना सामना झाला. दोघांमध्ये काही वेळासाठी चर्चादेखील झाली. मात्र ही चर्चा काय होती हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांच्या या चर्चेवर अनिल देशमुख यांच्या वकीलांनी घेतली हरकत घेतली. त्यानंतर, कोर्टाने सचिन वाझे ला आयोगाने कोर्टात बसण्यास आदेश दिला. मी सगळ्यांवर नजर ठेवू शकत नाही, तुमच्या बद्दल हरकत घेतलीये. असे आयोगाने म्हटले आहे.
मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी सचिन वाझे अटकेत असून परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना सचिन वाझेंचा उल्लेख केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai police