जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Cannes 2022: अमृता फडणवीस पोहोचल्या कान्स महोत्सवात, शेअर केला फोटो

Cannes 2022: अमृता फडणवीस पोहोचल्या कान्स महोत्सवात, शेअर केला फोटो

अमृता फडणवीस यांच्या त्या पोशाखाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मे : सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 (Cannes Film Festival 2022) च्या रेड कार्पेटची चर्चा सुरू आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलला (Cannes 2022) अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. त्यांच्या वेळी त्यांच्या लूकची विशेष चर्चा रंगते. अनेक प्रसिद्ध वेशभूषाकार या सेलेब्रिटीजचे लूक डिझाइन करत असतात. या फेस्टिव्हलमध्ये नियमितपणे हजेरी लावणारे काही कलाकार आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील कान्सला हजेरी लावणार आहेत. याबाबत त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साधारण दोन तासांपूर्वी त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यात त्या पाश्चिमात्य कपड्यांमध्ये असून शेजारी एक सूटकेसही आहे. या पोस्टमध्ये त्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी आल्याचंही नमूद केलं आहे.

जाहिरात

अमृता फडणवीसांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या पोशाखावर आपलं मत व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्याचं कौतुकही केलं आहे. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. केवळ सामाजिक किंवा संगीत क्षेत्रातीलच नव्हे तर अनेकदा ते राजकीय विषयावरही आपलं मत अत्यंत बोल्डपणे व्यक्त करतात. त्यामुळे अनेकदा त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावरही असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात