दिल्ली, 20 मे: कान्स फिल्म फेस्टिव्हलला (Cannes 2022) अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. त्यांच्या वेळी त्यांच्या लूकची विशेष चर्चा रंगते. अनेक प्रसिद्ध वेशभूषाकार या सेलेब्रिटीजचे लूक डिझाइन करत असतात. या फेस्टिव्हलमध्ये नियमितपणे हजेरी लावणारे काही कलाकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या कान्स फेस्टिव्हलला नेहमी उपस्थित असते. यंदाही ती अभिषेक बच्चन व मुलगी आराध्यासोबत कान्सला पोहोचली आहे. तिच्या वेगळ्या लूकची प्रत्येक फेस्टिव्हलमध्ये चर्चा होते. यंदा मात्र ऐश्वर्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 'इंडियाटाइम्स डॉट कॉम'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ऐश्वर्याचा लूक पाहून चाहत्यांनी अतिशय वाईट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्यानं केलेलं बोटॉक्स अतिशय किळसवाणं दिसत असल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. सौंदर्योपचारांमध्ये सध्या Botox प्रोसिजरची चर्चा आहे. बोटॉक्स ट्रीटमेंट म्हणजे काय आणि तिचे फायदे काय, याबद्दल जाणून घेऊ या
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चननं (Aishwarya rai Bacchan) यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये गुलाबी रंगाचा ब्लेझर, तशीच ट्राउझर आणि बूट असा पेहराव केला होता. या लूकमधले काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले.
View this post on Instagram
त्यानंतर ऐश्वर्यानं काळ्या रंगाचा गाउन घातला होता. त्याच्या एका बाहीवर थ्रीडी फुलं होती.
View this post on Instagram
अभिनेता टॉम क्रूझच्या Top Gun: Maverick या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी तिनं हा गाउन परिधान केला होता. ऐश्वर्याचा हा लूक ट्रोलर्सना मात्र आवडला नाही.
या लूकमध्ये ऐश्वर्या ‘बुढ्ढीजी’, ‘आँटीजी’ दिसते असं ट्रोलर्सनी म्हटलंय, तर बोटॉक्स केल्यामुळे ऐश्वर्या खूपच भयंकर दिसत असल्याचं अनेकांनी लिहिलंय.
काय असते बोटॉक्स ट्रीटमेंट?
बोटॉक्स ट्रीटमेंटमुळे (Botox Treatment) त्वचेवरच्या सुरकुत्या काही कालावधीसाठी नाहीशा होतात. सुरुवातीला ही उपचारपद्धती केवळ वैद्यकीय उपयोगासाठीच होती; मात्र त्यानंतर कॉस्मेटिक उपचारपद्धतीसाठीही त्याचा वापर होऊ लागला. यात botulinum toxin type A वापरलं जातं. त्यामुळे मर्यादित कालावधीसाठी स्नायूंची हालचाल मंदावते.
हेही पाहा - नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका
अर्थात चेहऱ्यासाठी ही उपचारपद्धती वापरली जात असल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या फारशा दिसत नाहीत. डोळ्यांच्या बाजूच्या व कपाळावरच्या सुरकुत्या, तसंच चेहऱ्यावरच्या बारीक रेषा नाहीशा करण्यासाठी या ट्रीटमेंटचा वापर केला जातो. ही उपचारपद्धती सुरक्षित असून त्याचा फारसा गंभीर परिणाम होत नाही. इंजेक्शनच्या स्वरूपात ती केली जाते. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तयारी करावी लागते. यासाठी फारसा वेळही लागत नसल्यानं अनेक सेलेब्रेटीज बोटॉक्सचा सर्रास वापर करतात. बोटॉक्स उपचारपद्धती केसांसाठीही वापरली जाते. त्यामुळे केस मुलायम होतात. केसांच्या बोटॉक्ससाठीही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय-बच्चनच्या लूकमुळे ट्रोलर्सनी बोटॉक्स ट्रीटमेंटवरून तिला ट्रोल केलं आहे. अनेक सेलेब्रिटीजना याआधीही अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बोटॉक्समुळे ऐश्वर्याचा चेहरा सुजल्याचं काहींचं म्हणणं आहे, तर बोटॉक्स ट्रीटमेंट करून वय लपवता येत नाही असं काहींनी म्हटलंय. एकंदरीतच, ऐश्वर्याच्या कान्समधल्या लूकनं चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
2018मधल्या Fanney Khan नंतर ऐश्वर्या सिनेमात दिसलेली नाही. आता ती मणिरत्नमच्या Ponniyin Selvan मध्ये दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.