मुंबई, 03 मार्च : ‘सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांचं भाषण पाहून मला मी नटसम्राट पाहत असल्याचे भास झाला होता. मी एथोलो, हॅम्लेट असं काही बोलत असल्याचे वाटत होते. शेवट कुणी किंमत देतो का किंमत असं झालं आहे’ असं म्हणत अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण करत भाजपच्या नेत्यांना चांगलेच झोडपून काढले. भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडले. ‘सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पाहून मला मी नटसम्राट पाहत असल्याचे भास झाला होता. मी एथोलो, हॅम्लेट असं काही बोलत असल्याचे वाटत होते. शेवट कुणी किंमत देतो का किंमत असं झालं आहे. तुमच्या भाषणाचा आवेश पाहून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना भीती वाटायला लागली की आमचं काय होणार, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच, ‘मी सुद्धा फोटोग्राफी करतो. तुमच्यातील कलाही अशीच कायम राहु द्या. ती उचंबून आली पाहिजे. कला कुठेही लपून राहता कामा नये कला ही जन्माजात असली पाहिजे. ती जिवंत असली पाहिजे’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे - राज्यपाल यांनी निपष्पातीपणाने भाषण केले आहे. राज्य सरकारची संपूर्ण कारकिर्द मांडली आणि ते सुद्धा मराठी मांडले आहे. ते मुद्दे काही जणांना पचवणे अवघड गेले आहे. - अचानक पाऊस आला की आपण भिजून जातो असं काही जणांचे झाले. - पाच रुपयांमध्ये थाळी देण्यात आली. मी राष्ट्रपतींचं भाषण पाहिलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत 8 महिन्यात 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात आले आहे. मग आठ महिन्यानंतर अचानक ते श्रीमंत झाले आहे का, त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरचे दर वाढवले आहे. - आम्ही 5 रुपयांमध्ये शिवभोजनाची थाळी देत आहोत. आम्ही भरलेली थाळी दिली फक्त वाजवण्यासाठी थाळी दिली नाही. गरिबांना विचारा भरलेली थाळी पाहिजे की वाजवायला थाळी पाहिजे. - फडणवीस यांनी राज्यासाठी एकत्र येण्याचे आश्वासन दिले आहे. चला मग दिल्लीत जाऊया कर्नाटक सरकारने कशी बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी माणसावर अन्याय केला, त्याची तक्रार करूया. केंद्राकडे जाऊन कानडीच्या सक्तीबद्दल सांगू - मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडेला आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे काय द्यायचंय ते सगळं दिले आहे. आम्ही काय भिकारी आहोत का कटोरा घेऊन प्रत्येक वेळा दिल्लीच्या दरबारात जायचे. मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा न देणे हा केंद्राचा करंटेपणा आहे. - स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या हे दोन वेळा पत्र आहे. भारतरत्न कोण देत असतो, मग इतक्या दिवस का दिले नाही. सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्यात आले आणि आपले नाव दिले, आणि आम्हाला विचारताय औरंगाबादला संभाजीनगर द्या, आणि संभाजीनगर हे नाव नक्की देऊ, पण त्याआधी या विधानसभेत संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचे ठरले होते, त्याची तारीख द्या, आम्हाला हिंदूत्व शिकवता. - ये महाराष्ट्र के लोगो पोछलो आँख का पाणी जो झुठ बोलते हे उनकी खत्म करो बेईमानी - भाषणात यमक असले म्हणून यशाचे गमक असं फडणवीस म्हणाले होते. पण आमच्यात कान पिळण्याची आणि काम करण्याची धमक सुद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.