मुंबई, 10 फेब्रुवारी : महिला घराबाहेर पडताच तिला धोका निर्माण होतो, तिच्यावर अत्याचार होतो असं अनेकजण म्हणतात. मात्र घरातही महिला सुरक्षित (secure) नाही असं चित्र कित्येकदा दिसतं. आता अशीच एक घटना समोर आली आहे. चुलत दिरानंच (brother in law) एका महिलेवर बलात्कार (rape) केला आहे. त्यासाठी त्यानं रीतसर कट रचला. उसाच्या रसातून गुंगीचं औषध पाजून त्यानं तिच्यावर बलात्कार केला. हा नराधम इतक्यावरच थांबला नाही. त्यानं या सगळ्या प्रकाराचं चित्रीकरण (video shooting) करून ते पीडित महिलेसह (victim woman) तिचा पती, इतर नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवलं. हेही वाचा मुलाच्या हव्यासापोटी आईनेच केली चार मुलींची हत्या; दोन महिन्यांनंतर झाली अटक चिखली (chikhli) पोलीस ठाण्याच्या (police station) हद्दीत हा प्रकार उघडकीस आला आहे. 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. पीडित महिलेचं वय तीस वर्ष आहे. या महिलेनं चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी 9 तारखेला तक्रार दिली आहे. पोलिसांनी चुलत दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तक्रारदार महिला आणि तिच्या पतीमध्ये भांडण झालं होतं. त्यामुळं ही महिला वेगळी राहत होती. हा आरोपी फिर्यादी महिलेच्या घरी आला आणि त्यानं तिच्या नकळत उसाच्या रसातून तिला गुंगीचं औषध पाजलं. सोबतच या भयानक कृत्याचं व्हिडिओ चित्रीकरण (video shooting) केलं. त्यानंतर ते या महिलेसोबतच तिचा पती (husband), नातेवाईक (relative) आणि मित्रमैत्रिणींना (friends) पाठवलं. हेही वाचा करीनाची अवस्था पाहून बसेल धक्का, PHOTO आले समोर या भयानक प्रकारची चर्चा सध्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये आहे. पोलीस अधिक तपास करत असून आम्ही लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.