• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, मुंबई पालिकेनं वसूल केला तब्बल 58 कोटींचा दंड

विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, मुंबई पालिकेनं वसूल केला तब्बल 58 कोटींचा दंड

No Masks: कोरोनाच्या काळात रस्त्यावर विना मास्क (without face masks) फिरणाऱ्या नागरिकांवर पालिकेनं (BMC) कारवाईचा बडगा उगारला होता.

 • Share this:
  मुंबई, 24 जून: मुंबईत कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाच्या काळात (Covid-19 pandemic) रस्त्यावर विना मास्क (without face masks) फिरणाऱ्या नागरिकांवर पालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईत मुंबई पालिकेनं तब्बल 58 कोटी रुपयांचा (58 crore in fines) दंड वसूल केला आहे. 23 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाची एकूण रक्कम 58 कोटी 42 लाख 99 हजार 600 रुपये इतकी आहे. हा आकडा एप्रिल 2020 ते 23 जून 2021 पर्यंतचा आहे. पालिकेनं विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 200 रुपये दंड ठोठावला आहे. हेही वाचा- 12 वीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाकडून राज्य मंडळांना महत्त्वाचे निर्देश एकट्या महापालिकेनं 50.29 कोटी रुपयांचा दंड वसूल केला तर मुंबई पोलिसांनी 7.6 कोटी रुपये वसूल केले. रेल्वेनं 50.39 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यापैकी मध्य रेल्वेने 21.18 लाख रुपये, पश्चिम रेल्वेने 22.63 लाख आणि हार्बर रेल्वेने 6.5 लाख रुपये दंड वसूल केला आहे. मुंबईत बुधवारी 863 नवे कोरोना रुग्ण मुंबईत बुधवारी 863 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 23 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. पालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 7,23,324 इतकी आहे. मृतांचा आकडा 15,338 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 6,91,128 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: