मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Param Bir Singh: कोर्टाने फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर मुंबईत दाखल

Param Bir Singh: कोर्टाने फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर मुंबईत दाखल

Param Bir Singh: परमबीर सिंग हे कुठे आहेत याची माहिती कुणालाच नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून ते बेपत्ता होते. अखेर ते आज मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई, 25 नोव्हेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) अखेर मुंबईत परतले आहेत. 100 कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर मुंबई किला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आता परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाले आहेत. (Param Bir Singh landed in Mumbai)

न्यायालयाने केले होते फरार घोषित

गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब होते. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल अशी शक्यता होती. पण त्याआधीच खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांना मुंबई किला कोर्टाने फरार घोषित केले. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आले. याच प्रकरणी रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आलं आहे. याच गोरेगाव खंडणी प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.

खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे. या दोघांनीही गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून व्यवहार हा व्यवहार झाला होता.

वाचा : जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत गोरेगाव पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी प्रकरणी कोर्टाने सिंग यांना फरार घोषित केलं होतं. कोर्टाची हीच नोटीस आता त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे. संबंधित कारवाई ही कोर्टाच्या आदेशान्वे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परमबीर सिंग फरार नाहीत, वकिलांचा सुप्रीम कोर्टात दावा

कोर्टाने एकीकडे परमबीर सिंग यांना फरार घोषित केलंय. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून देशातच असल्याचा दावा केला होता. तसेच ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती कोर्टाला दिली होती. पण त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती परमबीर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 6 डिसेंबरला होणार आहे.

First published:

Tags: Mumbai, Paramvir sing