मुंबई, 22 जुलै: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने (CBI) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) केली होती. ही मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.
राज्य सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोन आठवडे स्थगिती देण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्थगिती दिल्यास तपासात हस्तक्षेप केल्या सारखे होईल असे उच्च न्यायालयाने म्हणत याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमुर्ती एन जे जामदार यांनी ही याचिका फेटाळली आहे.
Bombay High Court dismisses a plea of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh seeking quashing of FIR against him registered by CBI in a corruption case
The court also dismisses a petition by the state govt, challenging few paragraphs of the CBI FIR against Deshmukh pic.twitter.com/49EuFlqSoO — ANI (@ANI) July 22, 2021
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा कहर! कोकण, कोल्हापूर नंतर आता नागपुरात मुसळधार पाऊस
सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं, माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय द्वेषाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत आपल्याला अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या या आरोपांनंतर सीबीआयने त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयने दाखल केलेला हा गुन्हा मागे घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची ही याचिका फेटाळली आहे. अनिल देशमुख यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याच ंबोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Mumbai, The Bombay High Court