मुंबई, 07 ऑगस्ट: काल रात्री उशीरा रेल्वे विभागाला (Railway Department) एका निनावी फोन (Unknown call) प्राप्त झाला आहे. फोनवरील व्यक्तीनं मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची (Bomb threat in mumbai) माहिती दिली. या माहितीनंतर मुंबई पोलिसांसह (Mumbai police) बॉम्ब शोधक पथकाची (Bomb squad) झोप उडाली आहे. संबंधित सर्वठिकाणी मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम राबवण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं ही शोधमोहीम राबवण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरू होतं. मात्र पोलिसांना कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही. दुसरीकडे, ज्या नंबरवरुन हा निनावी कॉल आला होता, त्या व्यक्तीला परत फोन केला असता, ‘माझ्याकडे असलेली सर्व माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका,’ असं त्या व्यक्तीनं सांगितलं आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीनं आपला फोन बंद करुन ठेवला. त्यामुळे निनावी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास अनेक अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित चारही ठिकाणी अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पण सतर्कतेचा उपाय म्हणून पोलिसांनी सर्व ठिकाणी कसून तपासणी केली आहे. हेही वाचा- दारुच्या नशेत घेतला आईचा जीव, व्यसनाला विरोध करणाऱ्या 75 वर्षांच्या आईचा खून नेमकं काय घडलं? रात्री 8 वाजून 53 मिनिटांनी रेल्वे विभागाला एक निनावी फोन आला होता. समोरील व्यक्तीनं सीएसएमटी, दादर, भायखळा, आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून त्वरित ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणांवर दाखल झालं. रात्री उशीरापर्यंत या चारही ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून तपास केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही. हेही वाचा- ना पुरावा ना साक्षीदार; मुंबईतील विवाहितेच्या हत्येचं उलगडलं गूढ; तिघांना अटक बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथक तातडीनं सीएसएमसी स्थानकावर0 दाखल झालं. यामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ खळबळ उडाली होती. मेन लाईन आणि वेटिंग हॉल रिकामा करण्यात आला. तसंच स्थानकावर सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉल यापासून तिकीट घर अशा सर्व ठिकाणांची पाहणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.