Home /News /mumbai /

'14 हजारपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष असेल',भाजपने केला दावा

'14 हजारपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष असेल',भाजपने केला दावा

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे. एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती.

    मुंबई, 18 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) आता जवळपास स्पष्ट झाले आहे. विधान परिषद निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेलेल्या भाजपला (BJP) ग्रामपंचायत निवडणुकीत दिलासा मिळाला आहे. भाजपने शिवसेनेला (Shivsena) पाठीमागे टाकत आघाडी घेतली आहे. '14 हजार गावांपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष असेल, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे.  एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्यानं आज 12 हजार 711 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होत आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणी शिवसेना आघाडीवर होती. त्यानंतर दुपारून चित्र पालटले आणि भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपला अपेक्षित यश मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. ग्रामीण भागात महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी आहे. त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीत उमटले आहे.  14 हजार गावांपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असेल,  असा दावा केशव उपाध्ये यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल आतापर्यंत जे निकाल हाती लागले आहे, त्यात भाजपला इतर पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर संपूर्ण आकडेवारी दिली जाईल, असं केशव उपाध्ये म्हणाले. दरम्यान, एकीकडे भाजपला यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे  कोल्हापूरमधील खानापूर गावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना धक्का बसला आहे. कारण पाटील यांच्या खानापूरमध्ये 9 जागांपैकी पहिल्या 6 जागा शिवसेनेने जिंकल्या, तर 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. खानापूरमध्ये शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आघाडी केली असतानाही शिवसेनेनं विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपसाठी ही नामुष्की मानली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gram panchayat

    पुढील बातम्या