राज्य सरकारची प्राथमिकता Oxygen, रेमडेसिवीर नव्हती तर वाझेची नियुक्ती होती; भाजपचा हल्लाबोल

राज्य सरकारची प्राथमिकता Oxygen, रेमडेसिवीर नव्हती तर वाझेची नियुक्ती होती; भाजपचा हल्लाबोल

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या संकटात आरोग्य यंत्रणा अपूर्ण पडत आहेत. यावरुन भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव (Coronavirus spike) वेगाने होत आहे. या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठा भार येत असून सुविधा सुद्धा अपूऱ्या पडत आहेत. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत आहे तर कुठे रुग्णांसाठी बेड्स, रेमडेसिवीर (Remdesivir) उपलब्ध होत नाहीये. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दिवसेंदिवस मृतकांचा आकडा वाढत आहे. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीसह इतर राज्यांवरही टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये केशव उपाध्येंनी म्हटलं, "गेल्यावर्षी कोरोना जगाला नवीन होता. सर्वांना तयारी करावी लागली. पण आता गेल्या वर्षभरात राज्यांनी काय तयारी केली. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर्स, बेड्स, हॉस्पिटल ही राज्यसरकारची प्राथमिकता नव्हती तर वाझेची पुर्नस्थापना ही होती."

Nashik Oxygen leak: नाशिकमध्ये हाहाकार; मृतकांचा आकडा वाढला, ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचा मृत्यू 

पोलीस दलातून सचिन वाझे याला कोरोना काळात राज्य सरकारने पुन्हा सेवेत घेतलं यानंतर मुंबईत आढळलेले स्फोटक प्रकरण, मनसुख हिरन मृत्यू प्रकरण समोर आले. इतकेच नाही तर 100 कोटी रुपयांची वसूली करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा ही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सचिन वाझे याला अटक झाली तर गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक, 24 रुग्णांचा मृत्यू

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज सकाळी ऑक्सिजन टँक लीक होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर ऑक्सिजन अभावी रुग्णालयातील तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनसह उतरही सुविधांची कमतरता जाणवत आहे तर दुसरीकडे राज्यातील कोरोना बाधितांची आणि मृतकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 21, 2021, 7:03 PM IST

ताज्या बातम्या