अमित शहा मुंबईत दाखल!, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर केलं अभिवादन

Samruddha Bhambure | Updated On: Jun 16, 2017 12:56 PM IST

अमित शहा मुंबईत दाखल!, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर केलं अभिवादन

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचं मुंबईत आगमन झालं आहे. मुंबई विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी शहा यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मुंबईच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर शहा आले असले तरी, अध्यक्ष झल्यापासून ते पहिल्यांदाच 'मोतोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा ठाकरे आणि शहा यांच्यात नेमकी काय चर्चा होते याकडे लागणार आहेत.

मुंबईत आल्याबरोबर एअरपोर्टहून शिवाजी पार्क इथल्या शिवरायांच्या पुतळ्याला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केल्यानंतर शहा भाजपच्या पक्षांतंर्गत बैठकीसाठी गरवारे क्लबकडे रवाना झाले आहेत.

या दैऱ्यात रविवारी दुपारी 12 वाजनेच्या सुमारास शहा 'मोतोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. या भेटीत अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रपतीपदाची निवडणुक, कर्जमाफी तसंच, गेल्या काही काळात ताणले गेलेले शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध आदिंवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी याकडेच भाजपचे आणि एनडीएचे अधिक लक्ष असणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे मन वळवण्यासठी तसेच, एनडीएतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला विश्वासात घेण्यासाठी शहा 'मातोश्री'वर जात असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2017 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close