मुंबई, 09 जून : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वच रुग्णालय हे रुग्णांनी खचाखच भरलेली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब होत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.
मुंबईतील अनेक शासकीय आणि मनपा रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्तींचे मृतदेह गायब होत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.
मुंबईतील केईएम, राजावाडी, शताब्दी हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि ट्रॉमा हॉस्पिटलमधून नातेवाईकांना माहिती न देता मृतदेह गायब झाले आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
Last few days, half dozen dead bodies of COVID patient's were GAYAB ( disappeared/misplaced) from BMC Hospitals. I wrote to Maharashtra Home & Health Ministers for Actions @mybmc @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @MumbaiPolice pic.twitter.com/haPQWKwUrX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 9, 2020
हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 2553 नवीन रुग्ण समोर आले. यासह राज्यात आता एकूण 88 हजार 528 रुग्ण आहेत. तर, 109 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या 3,169 झाली आहे. तर, मुंबईत 50 हजार 085 नवीन रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 1709 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 1661 रुग्ण निरोगी होऊन घरीही परतले आहे. यासह महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 40 हजार 975 झाला आहे.
भारत पाचव्या क्रमांकावर
कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारतात आता जगातील टॉप-5 देशांमध्ये आला आहे. कोरोनाचं क्रेंद ठरलेल्या स्पेन आणि इटलीला भारतानं मागे टाकले आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन यांचा क्रमांक लागतो. मात्र भारत 5व्या क्रमांकावर असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट हा सर्वात जास्त आहे. भारताप्रमाणेच रशियामध्येही मृतांचा आकडा कमी आहे.
संपादन - सचिन साळवे